आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ३

फिराकगोरखपूरी या नावाने लेखन करणारे रघुवीर सहाय लोकांना माहीत आहेत ते एक शायर म्हणून. त्यांनी जेवढे लेखन पद्यात केले आहे तेवढेच गद्यातही केले आहे. परंतु त्यांचे गद्यात्मक लेखन पाहिजे तसे लोकांपुढे आलेले नाही. १९४७ सालातील ताणतणाव पाहता त्यांनी प्रस्तुत दीर्घ लेख लिहिला होता. आज देशात पुन्हा तेच वातावरण निर्माण करण्यात आले असताना काही काळापूर्वीचा हा इतिहास आपल्याला निश्चितच मार्ग दाखवेल.  

१०. १८५७ च्या समरातहिंदू आणि मुसलमान एक होऊन परदेशी राजवटी विरुद्ध लढलेहोते. शंभरातील पंचान्नव मुसलमान इंग्रजांविरोधात लढत होते परंतु या स्वातंत्र्य लढ्यात देशातील फौजांना यश मिळाले नाही. त्याचे कारण हे नव्हते की मुसलमानांच्यामदतीने हिंदूंना चिरडले गेले,तर कारण हे होते की हिंदू जाती आणि हिंदू गोरखा आणि शिखांकडून स्वातंत्र्यवीरांना चिरडले गेले. त्यांची मदत इंग्रजांना मिळाली नसती तर १८५७ मध्येच इंग्रजांचा पाया उलथला गेला असता. ही विचार करण्याची आणि समजून घेण्याची बाब आहे की,आपल्या हिंदू आणिशीख बांधवांपैकीच लाखो लोकंइंग्रजांच्या इशाऱ्यावर देशाचे एवढे मोठे शत्रू बनले होते,परंतु मुसलमान देशाचे शत्रू सिद्ध झाले नाहीततर मग केव्हापासून हे मुसलमान देशाचे असे शत्रू बनलेत की निवाड्याच्या दिवसापर्यंत आपण त्यांच्याशी युद्धकरण्यास तयार होऊ पाहतो? जादू वगैरे झाली आहे का की एक हजार वर्ष भारतात राहत असलेला मुसलमान जगातील सर्वात वाईट, नीच आणि अधम समाज बनला?  अलिकडील वीस-पंचवीस वर्षाची गोष्ट आहे- जालियनवाला बागेत हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्या रक्ताचे बलिदान दिले गेले होते आणि हिंदू, मुसलमान आणि शिखांवर जनरल डायरच्या हुकूमाने गोळ्या घालणारे हिंदू गोरखाच होते. यानंतर जेव्हा महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारतभर स्वातंत्र्याची चळवळ संपूर्ण जोमात सुरू झाली तेव्हा त्यात हिंदूंच्या तुलनेत संख्येने एक चतुर्थांश असतानाही मुसलमानांनी हिंदूंच्या बरोबरीने भाग घेतला. तुरुंगात जाण्यात, ‘असहकार’करण्यात, मार व काठ्या सहन करण्यात, शाळा,कॉलेज आणि कौन्सिलचा बहिष्कार करण्यात आणि पुस्तके सोडण्यात मुसलमान हिंदूंपेक्षा मागे राहिले नाहीत. वास्तविकता ही आहे की,हजारातील चारशे मुसलमान या लढ्यात सहभागी झाले. आता राज्य करणे शक्य नाही हे इंग्रजांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यात फुट पाडली आणि झालेले काम बिघडले. यानंतर फुटीरतावादाचे विष संपूर्ण देशात पसरले आणि घृणेचा वणवा देशभर पेटला,ज्याला इंग्रजांचे धोरण प्रोत्साहन देत राहिले. तरीही संपूर्ण मुसलमान समाज बिघडला नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी मोठा लढा संपल्यावर जेव्हा आपले नेते तुरुंगातून सुटले आणि प्रांतांच्या विधीमंडळांची निवडणूक झाली तेव्हा हिंदू आणि शीखांसोबत ३३ टक्के मुसलमानांनी मुस्लिम लीगला साथ न देता काँग्रेसला साथ दिली. कित्येक ठिकाणी तर काँग्रेसला साथ देणाऱ्या मुसलमान मतदारांना त्यांच्याच सहधर्मियांनी जखमी केले आणि मारून टाकले, त्यांच्या मुलाबाळांची विटंबना करण्यात आली, त्यांच्या तोंडावर थुंकले गेले,त्यांच्या घरांची लुटालूट केली गेली आणि जाळली गेली. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतांनाही हे बहाद्दर मुसलमान देशप्रेमाच्या मार्गावरून डगमगले नाहीत आणि सीमेवरील प्रांतांमध्ये तर ते तीस टक्के नव्हे,शंभरपैकी ऐंशी मुसलमानांनी काँग्रेसला मत दिले. अशी शेकडो उदाहरणे देता येतील ज्यातून तळपत्या सूर्याप्रमाणे ह्या बाबी स्पष्ट होतात की, कोट्यावधी मुसलमान अतिशय भयंकर आणि वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ना हिंदूंचे शत्रू बनलेत ना शीखांचे. ना त्यांनी देशाशी द्रोह केला. हिंदू आणि शिखांनी मुसलमानांना आपला सर्वात मोठा शत्रू समजण्याऐवजी जमातवादाला आपला सर्वात मोठा शत्रू समजावा आणि त्यापासून बचाव करून असा नवीन भारत घडवावा जिथे हिंदू,मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारशी सारेच प्रतिष्ठेचे जीवन जगू शकतील आणि सर्वांनाच प्रगती करण्याची संधी असेल. थोड्याच दिवसात भारत आणि पाकिस्तानातील नऊ कोटी मुसलमान या देशाचे संरक्षण आणि प्रगतीसाठी एक मोठी शक्ती बनतील आणि हिंदू व शिखांसोबत खांद्याला खांदा लावून देशाचे जीवन उंचावतील.

११. जमातवाद आपल्याला अंध बनवून टाकतो. आपण चांगल्या गोष्टी पाहू शकत नाही व वाईट गोष्टीही पाहू शकत नाही. जेव्हा नौवाखलीमध्ये आणि पूर्व बंगालच्या काही भागात हजारो हिंदू स्त्री-पुरुष आणि बालकांना मारून टाकण्यात आले आणि हजारो घरे लुटली गेलीत. त्यानंतर लगेच बिहारच्या हिंदूंनी याचा मुसलमानांवर सुड उगवला. हजारो मुसलमान मारले गेले आणि हजारो घरे लुटली व जाळली गेली. बरेच नीच आणि वेडपट झालेले हिंदू याला योग्य असा सूड समजत राहीले आणि याला हिंदू समाजाची निशाणी मानत राहिले. परंतु झालं काय?  मारले जाणार्‍या, अपमानित केल्या जाणार्‍या,विनाश केल्या जाणार्‍या मुसलमानांमध्ये एक मोठी संख्या अशा मुसलमानांची होती जे जीवनभर मुस्लिम लीगशी लढत राहिले आणि तन-मन-धनाने गांधीजी आणि काँग्रेसच्या आज्ञेचे पालन करत राहिले. देशप्रेमी असणाऱ्या मुसलमानांना आपण ओळखू शकतो आणि त्यांचे संरक्षण करू शकतो,हे जमातवादाच्या वेडेपणा व उत्साहाने अशक्य केले आहे. नौवाखली आणि पूर्व बंगालच्या मुसलमानांचा सूड बिहारी मुसलमानांवर घेणे, मग तो काँग्रेसी असो किंवा मुस्लिम लीगचा, हा पहिल्या क्रमांकाचा भ्याडपणा व अधमपणाचा पुरावा आहे. देशावर प्रेम करणाऱ्या मुसलमानांना हिंदू धर्म आणि देशप्रेमाच्या नावावर कापले गेले, हे असे पाप होते ज्याच्या कलंकाचा टिळा आपण हिंदूंच्या मस्तकावरून पुसला जाऊ शकत नाही. याच्या अगदी उलट सिंधमध्ये घडले.

संपूर्ण भारतात हिंदू-मुस्लीम दंगलीचा कल्लोळ सुरू होता.लाखो मुसलमानांनी पळून जाऊन सिंधमध्ये आश्रय घेतला. तेथे शंभरपैकी पंचाऐंशी मुसलमान आहेत आणि पंधरा हिंदू,परंतु सिंधमधील लाखो मुसलमानांनी एक क्षणसुद्धा माणुसकी सोडली नाही.तेथील हिंदू भीतीने सिंधमधून पळू पहात होते. सिंधच्या मुसलमानांनी कुराण हातात घेऊन आणि आपल्या डोळ्यात पाणी आणून आपल्या हिंदू बांधवांना म्हटले की, तुम्ही आपले घर सोडू नका, सिंध जेवढा आमचा आहे तेवढाच तुमचाही आहे,आधी आम्ही मुसलमान गुंडांकडून मारले जाऊ,नंतरतुम्हाला झळ पोहोचू शकेल.

हे खरे आहे की वेडेपणाच्या अवस्थेत सिंधमधून बर्‍याचहिंदू आणि शिखांना पळावे लागले आणि काही शिख मारले गेले परंतु यात सिंधच्या कोणत्याही मुसलमानाचा हात नव्हता. हे कृत्य होते बाहेरून आलेल्या मुसलमानांचे आणि हे बाहेरून गेलेले बहुतेक मुसलमान असे होते ज्यांचे भारतात सर्वस्व लुटले गेले होते आणि त्यांच्या मनात सूडाची भावना  पेटलेली होती.

१२. जर आपण हिंदू किंवाशीख या नात्याने असे म्हणूकी,ही लुटालूट,मारामारी व दंगल आम्ही करत नाही व करू इच्छित नाही. उलट हे काम आधी मुसलमान करतात आणि नंतर नाईलाजास्तव त्याचा सूड घ्यावा लागतो किंवा प्रत्युत्तर द्यावे लागते,तर विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की देशाच्या एखाद्या भागात जर मुसलमान मारामाऱ्या,लुटालूट आणि दंगल करत असतील आणि त्याला हिंदू आणि शीख प्रत्युत्तर देतील तर त्या भागात किंवा देशाच्या इतर कोणत्याही भागात ही शृंखला कधी बंद होऊ शकतेका?किंवा यात कुण्या एकाचा विजय होऊ शकतोका? किंवा आतापर्यंत झालेला आहेका?  कलकत्ता,नौवाखली,पूर्व बंगाल,बिहार,गढमुक्तेश्वर आणि आपल्या प्रांताच्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये नंतर पूर्व आणि पश्चिम पंजाबमध्ये आणि देशाच्या काही भागांमध्ये अशी भयानक आणि अमानुष कृत्ये घडलेली आहेत ज्याची कल्पना करणे कठीण आहे. तर मग यामुळे एका धर्माला मानणाऱ्यांचा विजय झालाका? हिंदू जिंकलेका? शिख जिंकलेका?की सारेच हरलेत? कोणत्याही एका धर्माला मानणाऱ्यांचा विनाश दुसऱ्या धर्मास मानणाऱ्यांच्या विनाशापेक्षा कमी झालाआहेका? हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्यापैकी असा कोण आहे ज्याला या भयंकर घटना घडल्यानंतरही गर्व वाटेल? आणि दुसर्‍याधर्माला मानणाऱ्यांच्या तुलनेत आपल्या विजयाचा डंका वाजवू शकेल? ही भयानक लढाई अशी झालेली आहे की जर त्यापेक्षा शंभर पट मोठी असली आणि शंभर वर्ष सुरू राहिली तरी विनाश सर्वांचाच होईल आणि आपल्या विजयाचा झेंडा कुणीही फडकवू शकणार नाही. हासुड यशस्वी होऊच शकत नाही. ही दोन सापांमधील लढाई असल्यासारखी अशी लढाई आहे,ज्यात विजय कोणत्याही एका पक्षाचा होत नसतो उलट दोन्ही साप मरतात. हे आधीच सांगितले आहे की,ही लढाई हिंदू व शीख आणि दुसरीकडे नऊ कोटी मुसलमानांची लढाई असू शकणार नाही आणि याचा परिणाम हिंदू किंवा मुसलमान यापैकी एकाचा विजय नसेल उलट दोहोंचा नेहमीकरिता विनाश आणि गुलामी असेल.

ही उघड बाब आहे की,जो कोणी काही मुसलमानांची बळजबरी आणि अत्याचाराचा सूड दुसऱ्या निर्दोष मुसलमान स्त्री-पुरुष आणि बालकांवर उगवेल त्या हिंदू आणि शिखांपेक्षा पेक्षा अधम आणि नीच कोणी असू शकत नाही. असे करणे म्हणजे हिंदू आणि शीख धर्माला कलंक लावणे आहे. असे करणे हा हिंदू आणिशीख असल्याचा पुरावा नाही,उलट स्वतःला अमानुष लोकांपेक्षा नीच सिद्ध करणे आहे. असे केल्याने वाईटात वाईट राष्ट्र स्वार्थही साध्य होऊ शकत नाही. सूड घेतल्याने शक्तिमान, मर्यादा, धर्म, संस्कृती आणि संपत्ती इत्यादी प्रकारचा फायदा होऊ शकत नाही. अधम लोक असा विचार करतात की,आम्ही कुठेतरी दूरवर हिंदू आणि शिखांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा सूड आपल्या शेजारी मुसलमान स्त्री-पुरुष बालकांची लुटालूट करून, त्यांची घरे जाळून, त्यांचे खून करून आणि विटंबना करूनघेतला आहे. हिंदू आणि शीख धर्मस्थापन करणार्‍यांना अशा हिंदू आणि शिखांचे तोंड सुद्धा पहावेसे वाटणार नाही. एवढेच नव्हे तर धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर सूड उगवणे हा पहिल्या क्रमांकाचा अधमपणा आहे,तसेच हा सूड म्हणजे कोणता सूडही नव्हे. ना असे केल्याने मुसलमानांना कोणता धडा शिकवला जाऊ शकत,ना त्यांचे डोके ठिकाणावर आणले जाऊ शकत, नात्यांना चिरडले जाऊ शकत, ना त्यांचा खोडकरपणा कमी केला जाऊ शकत,ना त्यांना कमकुवत बनवले जाऊ शकत,ना त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवले जाऊ शकत. दहा,वीस,पन्नास लाख मुसलमान कुटुंबांची हत्या केल्याने आणि जाळल्याने या देशात मुसलमान समाज पुसला जाऊ शकत नाही आणि ना मुसलमान समाजाला कमकुवत केले जाऊ शकत. मग हे काम हत्या आणि लुटीचा सूड उगवण्याकरिता का केलेअसेना. मारपीट मुसलमानांकडून सुरू होते, ही गोष्ट सिद्ध केल्यानेही कार्यभाग साधणार नाही.(अपूर्ण)