मियां काव्य: चक्रव्यूहात अडकलेल्या समूहाचा आवाज

मागील १० जुलै२०१९ रोजी १० आसामी कवींच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला.  यापैकी बहुतांश मुसलमान आणि ‘मियां काव्य’ म्हटले जाते त्या काव्य प्रवाहाचे नेतृत्वकारी कवी आहेत. या प्रवाहाचे प्रमुख कवीहाफिज अहमद यांच्या कवितेच्या दोन ओळी खालील प्रमाणे आहेत-

“लिहा, लिहून घ्या, मी एक मियांआहे,एनआरसीत माझा अनुक्रमांक२००५४३ आहे, माझी दोन मुलं आहेत, आणखी एक पुढील उन्हाळ्यापर्यंत येणार आहे, तुम्ही त्याच्याबद्दलही घृणा बाळगणार आहात का? जशी तुम्ही बाळगता माझ्याबद्दल!”

या प्रवाहाच्या कवींची लेखणी मुख्यत्वे ज्यांच्या मस्तकीते बांग्ला देशीचे असल्याचे लेबलचिकटवण्यात आलेले आहे आणि  परदेशी असण्याचा कलंक वाहणे ज्यांच्या नशिबी आले आहे, अशा मुसलमानांचे आंतरिक दुःख अभिव्यक्त करते. यापैकी काही कविता इंग्रजीत लिहिल्या गेल्या आहेत, काही आसामीत तर काही स्थानिक बोलीभाषेत. कवींच्या विरोधात नोंदलेल्या एफ.आय.आर.मध्ये म्हटले आहे की, ‘आरोपी व्यक्ती आपल्या कवितांनी जगाच्या नजरेत आमच्या प्रदेशाची प्रतिमा एका क्रूर राज्याच्या रूपात सादर करीत आहेत, जे देशालाआणि विशेषतः आसामच्या सुरक्षेला धोका आहे….

वरउद्धृत केलेली कविता एका स्थानीय बोलीभाषेत लिहिली गेली आहे. अहमद यांचेवर आरोप लावण्यात आला आहे की,ते आसामी भाषेचा अपमान करत आहेत. अहमद यांनी क्षमा मागितली आणि म्हटले की, ते  आसामीला प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेचा भाग राहिले आहेत आणि म्हणून त्यांचा या भाषेविरोधात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संपूर्ण घटनाक्रमातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या कटु विवादाला याची पार्श्वभूमी आहे. आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या बरीच आहे. एवढी की, विभाजनाच्या वेळी जिन्ना आसामला पाकिस्तानचा भाग बनवू पाहत होते. विभाजनाची प्रक्रिया सुरू असताना आणि त्यानंतर आसाममध्ये हिंदू आणि मुस्लिम प्रवासी येऊन स्थायिक झाले. बांग्ला देशच्या निर्मितीनंतरसुद्धा ही प्रक्रिया सुरू राहिली.

आसाम मध्ये एन.आर.सी.तयार केले जात आहे. या प्रक्रियेमुळे जवळपास चाळीस लाख लोक एका मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याकारणाने एन.आर.सी.च्या मसुदा सूचीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. यादरम्यान हिंदु राष्ट्रवादाच्या विषयपत्रिकेमुळे शीख, हिंदू आणि जैनांनातर देशाचे नागरिकत्व दिले जाऊ शकते परंतु मुसलमानांना नाही,अशी तरतूद असलेले नागरिकत्वदुरूस्ती विधेयक भारत सरकारने आणले. एन.आर.सी.ची अंतिम यादी ३१ जुलैरोजी प्रकाशित होणार आहे. ज्या लोकांचे नाव एन.आर.सी.मध्ये नाही ते भयानक तणावातदिवस काढत आहेत. जर नागरिकत्व  दुरूस्ती विधेयक पारित झाले तर उर्वरित हिंदू धर्मीयांना तर देशाचे नागरिकत्व मिळेल परंतु मुसलमानांना मात्र देशनसेल. अलीकडेच सेवानिवृत्त सैन्य अधिकारी मोहम्मद सनाउल्लायांना नजरबंदी शिबिरात पाठवले गेले.यावरून एन.आर.सी.च्या प्रक्रियेत देशातील वैध नागरिकांना सुद्धा परदेशी घोषित केले जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे,हे स्पष्ट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण देशभर एन.आर.सी.ची प्रक्रिया राबवू पाहत आहेत. यात सुद्धा नागरिकत्वाचा आधार धर्मच असेल,हे उघड आहे.

मियां काव्य, हे प्रतिरोधाचे काव्य आहे. हे काय प्रतिबिंबित करते? सर्वप्रथम हे स्पष्ट आहे की, हे ना आसामच्या विरोधात आहे, ना आसामी लोकांच्या आणि ना आसामी भाषेच्या. हे तर केवळ मुसलमानांच्या वेदना आणि त्यांची पीडा व्यक्त करते. आसाममधील लाखो नागरिकांवर परदेशी असल्याचा आरोप वर्षोगणतीलावला जात राहिला आहे. यापैकी बहुसंख्य मुसलमान आहेत. आधी‘डाऊटफुल’ अथवा डी मतदार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली,  मग परदेशी व्यक्ती न्यायाधिकरणाने लोकांना नजरबंदी शिबिरात कोंबणे सुरू केले आणि मग त्यानंतर सुरू झाली एन.आर.सी.ची कसरत. जरी आसाममध्ये बांग्लाभाषी हिंदू सुद्धा त्यांचे लक्ष्य आहे,परंतु त्यांच्यासाठी तात्पुरत्या समाधानाची बाब ही आहे की,संशोधित नागरिकत्व अधिनियम हिंदू,शीख आणि जैनांनाशरणार्थी आणि मुसलमानांना घुसखोर घोषित करतो. राज्यात मुसलमानांना परदेशी ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील प्रमुख मुस्लिम नेते आणि प्रतिष्ठित नागरिक जेव्हाही सरकारवर टीका करतात अथवा एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करतात,तेव्हा त्यांना ताबडतोब पाकिस्तानात जाण्यास सांगितले जाते.

मागील काही दशकांमध्ये संपूर्ण जगात इस्लामबद्दल भीती आणि घृणेचे वातावरण निर्माण झालेआहे. ९/११/२००१ नंतर त्यात आणखी तीव्रता आलेली आहे. त्यापूर्वी सुद्धा जागतिक पातळीवर धर्माच्या नावावर कच्चा तेलाच्या संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याची मोहीम सुरू होती. भारतात १९९२-९३ (बाबरी मशिदउध्वस्त केल्यानंतर),२००२ (गुजरात) आणि २०१३ (मुजफ्फरनगर) मध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर समाजात मुसलमानांसंबंधीचुकीच्या समजुती आणखी खोलवर घट्ट झाल्या आहेत. देशातील सामूहिक वारशावर हिंदूंचा जेवढा हक्क आहे तेवढाच भारतीय मुसलमानांचाहीआहे. मुसलमान हे शेकडो वर्षांपासून भारताच्या सामाजिक जीवनाचे अंग राहिले आहेतआणि आज त्यांना देशाच्या बहुसंख्यांक विभागासाठी धोका असल्याचे सांगितले जात आहे. याची प्रतिक्रिया वेगवेगळ्या रूपात समोर येत राहिली आहे. २००५-०६ मध्ये देशातील अनेक मुस्लिम लेखक,सामाजिक कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ इत्यादींनी एकत्र येऊन  ‘आजच्या भारतात मुसलमान असण्याचा अर्थ काय आहे?’ या विषयावर विचारविनिमय केला होता, तेव्हा मला फार आश्चर्य वाटले होते. आपण सारेच हे पाहत आहोतकी,मुसलमान कशाप्रकारे आपल्या वस्त्यांपुरते मर्यादित होत आहेत.  असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या या समूहावर कट्टरपंथीयांचा पंजा आणखी घट्ट होत आहे.

मियां काव्यहे आसामचे मुसलमान मार्गक्रमण करीत असलेल्या मानसिक गोंधळाचे प्रतिक आहे. अशाच प्रकारची स्थिती देशाच्या इतर भागातही आहे. नागरिकाचा दर्जा कोणत्याही व्यक्तीला यासाठी महत्वाचा आहे की तो त्याला त्याचे मूळ अधिकार देतो. सन्मानदर्शक असलेल्या मियां ह्या उपाधीचाअर्थ आजच्या आसाममध्ये काही वेगळाच झाला आहे. एखाद्याला मियां म्हणण्याचा अर्थ आहेकी तो बांग्ला देशी मुसलमान आणि घुसखोर आहे. मियांहा शब्द आसाममध्ये शिवी बनलेला आहे. आपल्यापैकी ज्यांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे, त्यांनी हा विचार केला पाहिजे की शेवटी एक समूह एवढा भयभीत, तणावग्रस्त आणि व्याकुळ कां बरं झाला आहे?त्याच्याकडे तुच्छतेने कां बरं पाहिले जात आहे?

साहित्यहे समूहाचे आत्यंतिक दुःख आणि व्यथेच्या अभिव्यक्तीचे माध्यम राहिले आहे. आपण सर्वांनी पाहिले आहेकी,नामदेव ढसाळ आणि ज.वि.पवार यांच्या हृदय हेलावून टाकणार्‍या कवितांमध्ये दलितांचे दुःख कशा प्रकारे व्यक्त झाले होते. स्त्री चळवळीचे आपले साहित्य आहे, जे‘हाफ द स्काई’ (अर्ध्या आकाशा) चे दुःख आणि क्रोध व्यक्त करते. जर आपल्याला समतेवर आधारित समाजाची निर्मिती करायची असेल तर आपण आपल्या नागरिकांच्या विविध विभागांच्या आत्यंतिक दुःखाच्या अभिव्यक्तीला सहन करणे, ऐकणे आणि समजून घेणे शिकले पाहिजे. लेखाच्या सुरुवातीला उद्धृत कविता हृदयाला हात घालणारी आहे. त्या कवीच्या विरोधात एफ.आय.आर.नोंदवण्याचे औचित्यसमजण्याच्या पलीकडचेआहे.

लेखक मुंबई आय.आय.टी.चे निवृत्त प्राध्यापक असून इहवादाचा प्रचार व जमातवादाला प्रखरपणे विरोध करणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या विषयांवरील त्यांचे विपुल लेखन अनेक भाषेत उपलब्ध आहे.