Ram Puniyani

| @ | August 18,2019

भाजप आणि त्याच्या सहकार्‍यांच्या हिंदु-राष्ट्र स्थापनेच्या अजेंड्यात गाईचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. झुंडबळीहा याचा एकमेव परिणाम नाही. चित्रपट आणि इतर क्षेत्रातील एकूण ४९ दिग्गजांनी पत्रात म्हटल्यानुसार झुंडशाहीचे बहुतेक बळीधार्मिक अल्पसंख्यांक आणि दलित आहेत. परंतु गोमातेची कथा येथेच संपत नाही.तिचे कितीतरी अनेक पैलू सुद्धा आहेत.

बेवारशी गुरांची देखभाल करणाऱ्यांना सरकार एका गुरामागे दररोज ३० रुपये देईल,अशी घोषणा उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील मंत्री श्रीकांत शर्मा यांनी केली आहे. या योजनेसाठी सरकारने आपल्या अंदाजपत्रकात ११०  कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. बेवारशी गुरे, विशेषतः गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत, त्यामुळे योगी सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे. आधीच संकटात असलेल्या शेती-अर्थव्यवस्थेवर हे एक नवीन संकट आहे. बेवारस गुरे रस्ते आणि राजमार्गांवर फिरतअसतात, त्यामुळे रस्त्यावरील अपघातात वाढ होत आहे.

मागील सार्वत्रिक निवडणुकीत (२०१९) भाजपच्या जाहीरनाम्यातील एका बिंदूवर कदाचित आपण सर्वांनी लक्ष दिले नाही. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वचन दिले आहे की, तो‘राष्ट्रीय कामधेनु आयोग’ स्थापन करेल. याकरिता ५०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल. हा आयोग विश्वविद्यालयांमध्ये‘कामधेनु पीठां’चीस्थापना  करेल आणि गाईच्या गुणांची माहिती लोकांना देण्याकरिता जाणीव जागृती मोहीम राबवेल. आयोग गो-शाळांच्या जवळपास निवासी कॉम्प्लेक्स विकसित करेल आणि उत्पादनाच्या विक्रीसाठी दुकाने सुरू करेल. जर हे सर्व ग्रामीण अर्थव्यवस्थाबळकट करण्यासाठी आणि गुरांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग करण्यासाठी केले जात असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. परंतु केवळ गाईची या सन्मानासाठी निवड करणे हा केवळ एक राजकीय डाव आहे.

गो-रक्षणाच्या नावावर जी गुंडगिरी सुरू आहे, त्याचा परिणाम असा झाला आहे की,गुरांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक करणाऱ्यांपासून बळजबरीने वसुली करणारे असे कितीतरी समूह देशात सक्रिय झाले आहेत. शोध पत्रकार निरंजन टाकले यांनी रफिक कुरेशी हे नाव धारण करून व गुरांच्या व्यापाऱ्याचा वेश धारण करून अनेक वाहतूक कंपन्यांशी संपर्क साधला. एकीकडे गायींची वाहतूक करण्याकरिता प्रति ट्रक १५००० रुपयाची मागणी केली जात असे तर दुसरीकडे म्हशींच्या बाबतीत ही रक्कम केवळ ६५०० रुपये होती असे त्यांना दिसून आले. टकले यांच्या मतानुसार या बळजबरीच्या वसुलीचा संबंध चामड्याच्या व्यापाराशी आहे, कारण जनावरांच्या कत्तलीनंतर चामड्यावर मध्यस्थांचा अधिकार असतो. गो-रक्षकांचे समूह अधा-मधात हिंसा सुद्धा करत असतात जेणेकरून त्यांचा बळजबरी वसुलीचा व्यवसाय सुरळीतपणे वाढत रहावा.

आणखी एक मजेदार पैलू हा आहे की,एकीकडे देशात गो-रक्षणाच्या नावावर झुंडशाहीच्या घटना वाढत आहेत तर दुसरीकडे भारत हा जगात गो-वंश मांसाचा सर्वात मोठा निर्यातक देश बनण्याच्या मार्गावर आहे. सर्वसाधारण समजअसा आहे की,या मांसाच्या व्यापाराचे लाभार्थी मुसलमानआहेत, परंतु हे खरे नाही. वस्तुस्थिती अशी आहे की,या मांसाच्या व्यापारातूनआपल्या तिजोर्‍या भरणार्‍यांमध्ये बहुतेक हिंदू किंवा जैन आहेत. गो-वंश मांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये अल कबीर, अरेबियन एक्सपोर्ट, एमकेआर फ्रोजन फुड आणि अल-नूर यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे मालक मुसलमान आहेत, असेया कंपन्यांच्या नावावरून वाटते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, यापैकी बऱ्याच कंपन्या हिंदू आणि जैनांच्या (विशेषतः ब्राम्हण-सं.) मालकीच्या आहेत.

गाय/गो-वंश मांसाचा मुद्दा हा खरेतर समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे माध्यम आहे. भाजपच्या राजवटीत एकही  मोठी जातीय दंगल झाली नाही, असा दावा केला जातो. हे खरेही असू शकते. परंतु सत्य हेही आहे की, याअवधीत किरकोळ हिंसा आणि गायीच्या मुद्द्यावर झुंडशाहीच्या माध्यमातून समाजाचे जातीय/धार्मिक आधारावर ध्रुवीकरण आणखी प्रभावीरित्या केले जात आहे. वैदिक काळात यज्ञांमध्ये गायीचा बळी दिला जात असे आणि गो-मांस भक्षण ही सामान्य बाब होती, हे आपण सारे जाणतोच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शूद्र पूर्वी कोण होते) आणि डॉ. डी. एन. झा (पवित्र गाईचे मिथक) यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण लेखनात हे वास्तव रेखांकित केले आहे. स्वामी विवेकानंद सुद्धा हेच म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मतानुसार वैदिक काळात गो-मांसाचे भक्षण केले जात असे आणि वैदिक कर्मकांडांमध्ये गायीचा बळी दिला जात असे. अमेरिकेत एका मोठ्या सभेसमोर भाषण करताना त्यांनी म्हटले होते,जोहिंदू गो-मांस खात नाही, तो चांगला हिंदू नाही असे प्राचीन काळात मानले जात असे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही प्रसंगी त्याला बैलाचा बळी देऊन त्याचे भक्षण करावे लागत असे.’ (स्वामी विवेकानंद समग्र वाङम, खंड पृष्ठ ५३६, अद्वैत आश्रम, कलकत्ता, १९९७). 

हिंदू राष्ट्रवादाच्या ज्या आवृत्तीचा सध्या मोठा गाजावाजा आहेतो आर.एस.एस.च्या विचारधारेने प्रेरित आहे. हिंदू-राष्ट्रवादाचा आणखी एक प्रवाह हिंदू महासभेचा आहे, ज्याच्या प्रमुखप्रवक्त्यांमध्येसावरकरांचा समावेश होता. ते संघ परिवाराचे प्रेरणा-पुरुष आहेत. परंतु गायीच्या बाबतीत त्यांचे विचार काहीसे वेगळे होते.  त्यांचे मत होते की, गाय ही बैलांची माता आहे, मनुष्याची नव्हे. गाय एक उपयोगी जनावर आहे आणि गाईची देखभाल करताना ही वस्तुस्थिती ध्यानात ठेवली पाहिजे, असेहीत्यांचे मत होते.‘विज्ञाननिष्ठा निबंधा’त ते लिहितात, ‘गाईचे रक्षण यासाठी करायचे नव्हे की ती दैवी आहे,तर यासाठी केले पाहिजे कारण तो एक उपयोगी पशु आहे.’ हिंदू राष्ट्रवादाच्या संघाच्या आणि महासभेच्या प्रवाहांपैकी संघाचा प्रवाह अलीकडे देशावर प्रभाव गाजवत आहे आणि संघ याचा उपयोग गायीच्या नावावर समाजाला विभाजित करण्याकरिता करीत आहे.

मजेदार गोष्ट अशी आहे की,भाजपएकीकडे उत्तर भारतात गायीच्या नावावर वादंग उभा करत आहे तर दुसरीकडे तोच भाजप केरळ, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये या मुद्द्यावर मौन धारण करून असतो. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधींना विनंती केली की त्यांनी देशात गो-हत्येला प्रतिबंध घालण्याचा कायदा करावा. गांधीजींनी यावर जे उत्तर दिले ते आपल्या बहुवादी समाजाला मार्गदर्शक ठरावे. त्यांनी म्हटले, ‘भारतात गोहत्येला प्रतिबंध करण्यासाठी कायदा केला जाऊ शकत नाही. हिंदुंकरिता गो-वध प्रतिबंधित आहे, याबद्दल मला मुळीच शंका नाही. मीसुद्धा गो-सेवा करण्याची शपथ घेतलेली आहे. परंतु माझा धर्म हा इतर सर्व भारतीयांचा धर्म कसा असू शकतो? जे हिंदू नाहीत त्या भारतीयांवर बळजबरी करणे असा याचा अर्थ होईल….. असे तर नाही आहेकी, भारतीय संघराज्यात केवळ हिंदू राहतात. मुसलमान, पारशी, ख्रिश्चन आणि इतर धार्मिक समूह सुद्धा येथे राहतात. भारत आता हिंदूंची भूमी बनलेली आहे, असे हिंदूंना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जे येथे राहतात, भारत हा त्या सर्वांचा आहे.’

एकीकडे आपले नागरिक आणि आपला समाज प्रगती करेल अशा पावलांची प्रतीक्षा देश करत आहे तर दुसरीकडे सरकार गायींची देखभाल आणि गायींवर बेगडी संशोधन करण्याकरिता पैसा पुरवत आहे. यातून देशाचे मुळीच भले होणार नाही.(अनुवादीत)

लेखक मुंबई आय.आय.टी.चे निवृत्त प्राध्यापक असून इहवादाचा प्रचार व जमातवादाला प्रखरपणे विरोध करणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या विषयांवरील त्यांचे विपुल लेखन अनेक भाषेत उपलब्ध आहे.

Leave a Comment