The Leaflet

| @theleaflet_in | August 11,2019

फिराक’ गोरखपूरी या नावाने लेखन करणारे रघुवीर सहाय लोकांना माहीत आहेत ते एक शायर म्हणून. त्यांनी जेवढे लेखन पद्यात केले आहे तेवढेच गद्यातही केले आहे. परंतु त्यांचे गद्यात्मक लेखन पाहिजे तसे लोकांपुढे आलेले नाही. १९४७ सालातील ताणतणाव पाहून त्यांनी प्रस्तुतप्रदीर्घ लेख लिहिला होता. आज देशात पुन्हा तेच वातावरण निर्माण करण्यात आले असताना काही काळापूर्वीचा हा इतिहास आपल्याला निश्चितच मार्ग दाखवेल.

 

आता मुसलमान म्हणून याकडे पाहूया

 

१. आम्हा मुसलमानांना या देशात येऊन आणि राहून एक हजार वर्षांच काळ लोटला आहे. जोपर्यंत या देशात आम्हाला चांगले दिवस होते,तोपर्यंत सख्खे नातेवाईक मिळून-मिसळून राहतात तसे आम्ही मुसलमान येथील इतर धर्मीयांसोबत मिसळून गेलो. जगाच्या इतिहासात अनेक धर्मियांच्या संगमाची उदाहरणे फारच कमी सापडतात. मुसलमानांनी हिंदू समाज आणि भारतावर एवढा चांगला प्रभाव टाकला आहे की, मुसलमानांना भारताकरीता एक वर मागावा लागला. युद्ध होत राहिलेत,परंतु प्रत्येक संघर्षानंतर हिंदू आणि मुसलमानांचे जीवन-प्रवाह आणखी चांगल्याप्रकारे मिळत असत. अशाच प्रकारे मिळती-मिसळती उज्वल संस्कृती या देशात घडत राहिली आणि सामाजिकतेची एक नवीन भावना मुसलमानांच्या मनात वाढत राहिली. भाषा, साहित्य, ललित कला, चाली-रीती आणि प्रत्येक बाबतीत हिंदू मुसलमान एकमेकांवर प्रभाव टाकत राहिले. एकमेकांपासून तेएवढं काही देत घेत राहिले आहेत, त्यांनी एकमेकांपासून एवढंप्राप्त केलं आहे की या संबंधांना तोडले जाऊ शकत नाही. येथील मुसलमानसुद्धा जगातला तसाच माणूस आहे जसा येथील हिंदू. येथील मुसलमान जगभरातल्या मुस्लिम लोकसंख्येचा एक भाग निश्चितच आहे. परंतु दूर कशाला जायाचं, बंगालचा मुसलमानाची बंगालच्या हिंदूंशी जेवढी जवळीक आहे तेवढी जवळीक भारतातील कोणत्याही इतर प्रांतांतील मुसलमानांशी नाही. हीच गोष्ट भारतातल्या प्रत्येक प्रांतात वसलेल्या मुसलमानांची आहे. त्यांची आपल्या प्रांतातील हिंदूंशी जेवढी जवळीक आहे अथवा आपल्या प्रांतांतील शिखांशी जेवढी जवळीक आहे तेवढी इतर प्रांतातील मुसलमानांशी नाही. भारतभरातील मुसलमानांची या देशातील हिंदू आणि इतर धर्मियांशी जेवढी जवळीक आहे तेवढी इस्लामी देशांच्या मुसलमानांशी नाही. हत्याकांडंआणि दंगलींनी ही जवळीक आणि आपुलकी नष्ट केली जाऊ शकत नाही. येथील मुसलमानांच्या संस्कृतीची येथील हिंदूंसंस्कृतीशी जेवढी जवळीक आहे तेवढी अरबस्थान, इराण, मिस्रआणि तुर्कस्थानच्या संस्कृतीशी जवळीक नाही. कुराण एवढा मोठा ग्रंथ आहे आणि इस्लामच्या पैगंबरांचे एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे की, यातून एक नव्हे तर कितीतरी प्रकारच्या संस्कृती जन्माला आल्यात. जर येथील मुसलमानांना एका दिवसात किंवा हळूहळू भारताबाहेर कोणत्याही इस्लामी देशात पाठवून वसवले तर त्यांचे जीवन आणि देशातील जुन्या मुसलमान रहिवाशांचे जीवन या दोहोंचीही नासाडीहोईल.

२. जी मुस्लिम नाही अथवा कलमा पढत नाही,अशी मानव जातीची एक मोठी लोकसंख्या सर्वच्या सर्व नास्तिक  किंवा नारकी आहेत, असे समजणे किंवा म्हणणे इस्लाम धर्म आणि त्याच्या पैगंबराला नाकारणे आहे. नास्तिक  किंवा इस्लामचे शत्रू त्यांना म्हटले गेले आहे जे पैगंबरांच्या इस्लामच्या प्रचार आणि प्रयत्नांना अनुचित पद्धतीने रोखत अथवा नाश करत असत. जेव्हा जगात इस्लामचा प्रसार झालेला आहे आणि जगातील अनेक लोक मुसलमान  नसताना  सुद्धा त्यांनी मुसलमानांना अनेक उचित अधिकार दिले आहेत किंवा त्यांच्यासोबत मिळून-मिसळून राहण्यास तयार आहेत,तेव्हा त्यांना पैगंबर अथवा इस्लामच्या प्रयत्नांना वाईट आणि नाश करणाऱ्यांना बोलावले जाते तसे बोलावणे, ही इस्लामची सेवा नव्हे तर इस्लामला बदनाम करणे आहे. इस्लामचे सर्वात मोठे शत्रू कलमा पढणारे ते मुसलमान आहेत जे कलमांना पढणाऱ्या अथवा इतर धर्माचे पालन करणाऱ्यांना नास्तिक व मुस्लिमांचे शत्रू समजतात आणि तसे सांगतात. मुसलमानांच्या तेराशे वर्षे जुन्या  इतिहासात जेवढ्या लढाया झाल्यात, मुसलमान राज्ये जितक्यावेळा आपसात लढलीत, जितक्यावेळा एका देशातील मुसलमान रहिवाशांना  दुसऱ्या देशातील मुसलमान रहिवाशांनी गुलाम बनवले आहे, तेवढ्या लढाया मुसलमान आणि हिंदू यांच्यात झालेल्या नाहीत आणि तेवढे बिगर-मुसलमानांनी मुस्लिमांना गुलामही बनवलेले नाही. धर्म किंवा इतिहास, विचार व मत किंवा जगातील उघड सत्यअसो, कोणीही याची साक्ष देत नाहीत की मुसलमानांचे शत्रू बिगर-मुस्लिम आहेत अथवा मुसलमानांचे शत्रू हिंदू राहिलेले आहेत.

३. युगे बदलत राहिलीतसा इतिहास बदलत असतो, माणुसकी प्रगती करत जात असते. ही बाब समजून न घेणे आणि आपल्या जीवनाला या विचारांच्या साच्यात न वाढवणे हे कोणत्याही समाजासाठी आत्महत्येची सूचना आहे. आतापासून काही शतकांपूर्वी पर्यंत जगातील कितीतरी देशांची अशी अवस्था राहिलेली आहे की, लक्षावधी- कोट्यावधी रहिवाशांवर थोड्याश्या मुसलमानांचे शासन राहिले.त्या युगात असं होणं अनुचित अथवा वाईट गोष्ट नव्हती, परंतु याबाबतीत काही विचार करण्याआधी मुसलमानांनी हे जाणून घेणे गरजेचे आहे की,  कोणत्याही देशातवर अथवा समजावर ज्याला आपण इस्लामी राज्य म्हणतो ते स्थापन झाल्यानंतर, परिस्थिती येथपर्यंत पोहोचली की मुसलमानांची बहुसंख्य लोकसंख्या उपाशी, वस्त्रहीन, त्रस्त आणि पिडीतराहिली.  भारतात आम्ही म्हणतो की, शेकडो वर्षेपर्यंत इस्लामी शासन अस्तित्वात राहिले परंतु उच्चश्रेणीच्या मुठभर मुसलमानांशिवाय शंभरातील ९० मुसलमानांची परिस्थिती आणि जीवन हिंदूंपेक्षा मुळीच चांगले नव्हते. ही गोष्ट इंग्रजांबाबत म्हटली जाऊ शकत नाही. त्यांची संख्या या देशात बोटावर मोजता येऊ शकत होती आणि हे मूठभर इंग्रज येथील साधारण हिंदू आणि मुसलमानांपेक्षा जास्त सुखी आणि शिक्षित होते. परंतु आपण काळजीपूर्वक विचार केला तर शंभरातील एक इंग्रजच येथे चांगल्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत होता. इतर इंग्रज इंग्रजी  सैन्यात शिपाई होते ज्यांना काहीही मिळत नव्हते आणि जे साधारणतः मूढसुद्धा असत. ही गोष्ट निराळी आहे की इंग्रज सरकारच्या भाकरी खाऊन ते भारतीयांवर वाचक ठेवत,परंतु इंग्रजी राजवटीत सुद्धा लाखो हिंदू-मुसलमान गोर्‍या सैन्याचे शिपाई आणि सार्जंटांच्या तुलनेत कितीतरी जास्त सुखी आणि शिक्षित होते. ही अवस्था जर लाख-सव्वा लाख इंग्रजांच्या राजवटीत राहिली तर या मोठ्या देशाच्या लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग असलेल्या मुसलमानांना कोणता चमत्कार करून मुसलमान राजा किंवा नबाब किंवा तालुकदार किंवा जागीरदार किंवा इस्लामी राजवट जास्त श्रीमंत आणि शिक्षित बनवू शकत होती? आज भारतात सुद्धा शेकडो-हजारो मुसलमान घराणी लक्षावधी-कोट्यावधी हिंदू घराण्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत आणि राहतील. पाकिस्तानात सर्वकाही घडल्यानंतर आता हजारो हिंदू आणि शीखघराणी अशी आहेत जी लक्षावधी मुसलमान घराण्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत आणि राहतील. इस्लामी राजवटीचा उपहास अशी कोणती जादू नाही जी मुसलमानांचे जीवन छूमंतर…सरशी राख बनवेल किंवा त्यांना सोन्याने मढवेल किंवा जगाच्या बुद्धी, शिक्षण आणि गुणांचे वरदान मुसलमानांना देईल. जगाच्या इतिहासात धर्माधिष्ठित राज्य आपल्या सह-धर्मीयांना वर आणण्यात कधीही यशस्वी ठरले नाही.

४.  आजसुद्धा तुम्ही कोणत्याही इस्लामी देशावर दृष्टी टाकली तर हे स्पष्ट दिसून येईल की, तेथील सामान्य मुसलमानांच्या तुलनेत शेकडो बिगर-मुसलमान जास्त चांगल्या स्थितीत आहेत. कापा-कापीनंतर आता लाखो हिंदू आणि शीख पाकिस्तानात वसलेले आहेत आणि शरीयती राजवट, इस्लामी राजवटीच्या घोषणा असतांनाही सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा भारतातून गेलेले लाखो मुसलमान तेथे लुटले जाऊन पुन्हा भारतात परत येत आहेत.

पाकिस्तान शंभर वर्ष नव्हे,हजार वर्षापर्यंत ही प्रगती करत राहिला तरीही तेथे अशी कोणतीही इस्लामी संस्कृती फुलू शकत नाहीजिच्या तुलनेत भारतातील मुसलमानांची संस्कृती अथवा भारतातील इस्लाम कोणत्याही प्रकारे खालची असेल.

भारतातील मुसलमानांच्या तुलनेत मानसिक,  बौद्धिक, आत्मिक व भौतिक अशा कोणत्याही प्रकारची प्रगती पाकिस्तान अथवा जगातील इस्लामी देशातील मुसलमान करू शकणार नाहीत, कारण भारताचे सरकार कोणताही धर्म किंवा संस्कृतीची दडपणूक करण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचा न्याय्य वाटा हिसकावून घेण्यासाठी स्थापन झालेले नाही. ज्या दिवशी असं होईल, अर्थातच भारताचे सरकार नाश पावेल. हे असे युग आहे जे हिंदू राज्य हे हिंदूंसाठीच मृत्यूचा संदेश बनेल आणि इस्लामी राजवट मुसलमानांनाच संपवून टाकेल. केवळ प्रजेचे राज्य आणि शंभर टक्के प्रजेचे राज्य स्थापनहोण्यातच हिंदू,  मुसलमान आणि शीख अशा सर्वांचे भले आहे. मिळून-मिसळून असलेल्या प्रजाराज्यामुळे सर्वांना केवळ धन-दौलतीचाच फायदा नाही,तर सर्वांची संस्कृती, कला व साहित्य आणि धर्मालाही फायदा आहे. (अपूर्ण)

 

Leave a Comment