The Leaflet

| @theleaflet_in | August 31,2019

मोठ-मोठ्या नोकऱ्या आणि पदांसाठी प्रत्येक धर्माच्या लोकांना पुरेपूर संधी आणि पुरेपूर सहाय्य दिल्यानंतर प्रश्न शेकडा ९९ % मुसलमानांचा प्रश्न राहतो आणि हा प्रश्न सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. हिंदुंचीसंख्या जास्त असल्या कारणाने ते बर्‍याच संख्येने लहान नोकऱ्यांमध्ये सामावले जातील आणि मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लहान-सहान नोकर्‍या मिळणार नाहीतआणि नोकऱ्यांमध्ये प्रगती करण्याच्या संधी मुसलमानांना हिंदुंपेक्षा कमी मिळाव्यात याबाबत न्यायाच्या पडद्याआड पक्षपात करण्यात येईल,असेहोऊच शकत नाही.  जर पगार वाढेल तर सर्वांचा वाढेल, कर सर्वांकडून एकसारखाच वसुल केला जाईल, काम आणि सुट्ट्या सर्वांना सारख्याच मिळतील. याच प्रमाणे हे होऊ शकत नाही की, कामगार आणि शेतकरी, कारागीर आणि सामान्य काम करणाऱ्यांमध्ये हिंदुना जास्त लाभ आणि मुसलमानांना कमी लाभ मिळेल. प्रत्येक व्यवसाय करणारे मग ते हिंदुअसो की मुसलमान, खालच्या जातीचे असोत की वरच्या जातीचे, ख्रिश्चन असोत, शीख असोत, फारशी असोतकिंवा कोणीही असोत,ते आपली कामगार संघटना बनवतील, आपल्या व्यवसायातील लोकांच्या सभा आणि पंचायती बनवतील आणि मिळून-मिसळून वर येतील व उत्तरोत्तर उन्नती करत जातील. ज्या सरकारचा आणि समाजाच्या विचारांचा पाया जमातवादावर असेल ते राज्य आणि समाज ज्याचे चित्र त्यांनी रंगवले तेवढी प्रगती करू शकत नाही. हे शक्य नाही ही की, भारतात जर शेकडा ९० %लोकसंख्येला वर आणले तर शेकडा १० %मुसलमान लोकसंख्येला त्यांच्या वस्त्यांमध्ये सोडावे किंवा पाकिस्तानात शेकडा ७५ किंवा ८० %लोकांचे जीवन चांगल्या प्रकारे सुखी व आनंदी केले गेले तर तेथील बिगर-मुसलमान लोकांना दारिद्र्य आणि अपमानाचे जीवन जगण्यासाठी सोडून देण्यात येईल.

प्रजेच्या उन्नतीचे विभाजनहोऊ शकत नाही. वरवरच्या चकाकीच्या नावावर  मुसलमानांची प्रगती आणि हिंदुंच्या उन्नतीचा काळ संपलाआहे,परंतु हा जमातवाद कशासाठीहिंदुराज्य आणि मुस्लिम राज्याच्या घोषणाकशासाठी?

ह्या बाबी काल्पनिक आहेत आणि आपण जीवनाच्या डोळ्यात डोळे घालून पुढे वाटचाल वाटचाल करण्यापासून त्या रोखतात. जमातवादी हिंदुहे हिंदुंसाठी धोकादायक आहेत, मुसलमानांकरिता तेवढे धोकादायक नाहीत. जमातवादी मुसलमान हे त्यांच्या जमातीला नुकसान पोहोचवणारे आहेत, हिंदुंकरिता तेवढे नुकसानकारक नाहीत.  आणि हीच अवस्था जमातवादी शीख, जमातवादी पारशी, जमातवादी अँग्लो-इंडियन आणि जमातवादी ख्रिश्चन यांची आहे. हे सारेच आपल्या समाजाचे शत्रू आहेत. जमातवादाच्या आधारावर आपल्या संप्रदायाची सेवा केली जाऊ शकत नाहीतर जमातवादापासून बचाव करून आपल्या पंथाची, धर्माची आणि आपल्या सहधर्मीयांची प्रगती होऊ शकते. किंवा असे म्हणा की, दुसर्‍या संप्रदायाच्या, दुसर्‍या धर्माच्या लोकांची उन्नती आणि सुख अशक्य आहे.

जग एवढे विशाल आहे की, हे एका धर्माने सांभाळले जाऊ शकत नाही. हिंदुसंस्कृती, मुस्लिम संस्कृती आणि बौद्ध संस्कृती ह्या मोठ-मोठ्या संस्कृती असून सुद्धा एकमेकांपासून काहीशा वेगळ्या आहेत असे जरी आपण मानले तरी या वेगळेपणाची गरज आहे. जो इस्लाम बिगर-इस्लामी संस्कृतींनीप्रभावित झाला नाही तो या इस्लाम पेक्षा कमी संपन्न असेल. बिगर-इस्लामीसंस्कृतींनी सुद्धा प्रभावित झालेल्या हिंदु संस्कृतीच्या तुलनेत  जगभरातल्या अहिंदु संस्कृतींचा प्रभाव नसलेली संस्कृतीकनिष्ठ दर्जाची असेल,जी इस्लाम व युरोप आणि  जगभरातील इतर प्राचीन व आधुनिक संस्कृतींनी प्रभावित होते.  आजच्या हिंदुसंस्कृतीचा स्वभाव तीचारस आणि तिचे वास्तव स्वरूप समजलेच जाऊ शकत नाही.

सध्या हिंदु संस्कृतीवरईस्लामी संस्कृती आणि युरोपच्या इतर वर्तमान संस्कृतींचा प्रभाव कोणत्या पातळीपर्यंत आहे, हे आपण पारखू शकलो नाही. ज्यात इतर संस्कृतींची सरमिसळ झालेली आहे त्या हिंदु संस्कृतीचा लाभ घेतला नसता तर रविंद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद,पंडित जवाहरलाल नेहरू आणि शेकडो वरिष्ठ हिंदु एवढी मोठी व्यक्तिमत्वे झालीच नसती. त्याचप्रमाणेमुस्लिमेतर संस्कृतीचा प्रभाव पडला नाही असा त्यांचा इस्लाम असता तर डॉ. मोहम्मद इकबाल आणि बरेच उच्च विचारक मुसलमान एवढे मोठे किंवा महान झाले नसते. हजारो तत्व मिळून आणि विरघळून किमयेची पात्रता प्राप्त करतात आणि हीच अवस्था संस्कृतीच्या किमयेची सुद्धा आहे.

आपण जर भारत आणि पाकिस्तानात जमातवादाच्या संकुचित आणि विनाशाकडे जाणाऱ्या चार भिंतींपासुन  स्वतंत्र होऊन निधर्मी आणि समूहवादापासून मुक्त आणि प्रगत लोकराज्य फुलण्याची संधी दिली तर आजपासून काही दिवसांतच या देशात हिंदुधर्म आणि हिंदुसमाज, ईस्लाम आणि मुस्लिम समाज, प्रत्येक धर्म आणि प्रत्येक संस्कृती असे काही उज्वल स्वरूप धारण करेल की, प्रत्येक संस्कृतीच्या लोकांना ज्ञान आणि कला, भाषा आणि साहित्य, तत्वज्ञान आणि विज्ञान अशाचाकाकत्या स्वरूपात दिसून येतील ज्याचे स्वप्न जमातवादी आणि धर्मांध लोक सुद्धा पाहू शकत नाहीत. हिंदु राज्य हिंदुसंस्कृती संपुष्टात आणेल, ईस्लामी राज्य ईस्लामी संस्कृतीचा खात्मा करेल आणि जमातवादी राज्य आपल्याच सहधर्मीयांसह विनाश पावेल. (समाप्त)

Leave a Comment