The Leaflet

| @theleaflet_in | July 28,2019

फिराकगोरखपूरी या नावाने लेखन करणारे रघुवीर सहाय लोकांना माहीत आहेत ते एक शायर म्हणून. त्यांनी जेवढे लेखन पद्यात केले आहे तेवढेच गद्यातही केले आहे. परंतु त्यांचे गद्यात्मक लेखन पाहिजे तसे लोकांपुढे आलेले नाही. १९४७ सालातील ताणतणाव पाहता त्यांनी प्रस्तुत दीर्घ लेख लिहिला होता. आज देशात पुन्हा तेच वातावरण निर्माण करण्यात आले असताना काही काळापूर्वीचा हा इतिहास आपल्याला निश्चितच मार्ग दाखवेल.

१३.  आता प्रश्न असा उपस्थित होतो की, मुसलमानांनी जर कुठे लुटालूट सुरू केली तर आपण हिंदू आणि शिखांनी हातावर हात ठेवून शांतबसायचे का? गुलाम माणसांप्रमाणे विचार करण्याचा काळ आता राहिलेला नाही तर एक स्वतंत्र समाज या नात्याने या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे,असे या प्रश्नाचे उत्तरआहे. पाकिस्थानात नव्हे तर भारतात जे चार कोटी मुसलमान आहेत त्यांच्या बाबतीत आपण या प्रश्नावर विचार करावा. याचे पहिले उत्तर हे आहे की हा प्रश्नच उपस्थित होत नाही. येथे शंभरात आठ-नऊ मुसलमानांना काही कुत्रे चावलेलेनाही की,ते येथील शंभरात ९० असलेल्या लोकसंख्येवर तुटून पडतील. समजा, हे मान्यही केले की मुसलमानांकडून काही दंगलीघडवल्याजाऊ शकतात तर त्या अतिशय मर्यादित स्वरूपातच होऊ शकतात.

आता हिंदू मुसलमानांना आपसात लढवणारे इंग्रज येथे राहिलेले नाहीत. येथे प्रजेचे राज्य आहे. सेवा, पोलीस, अधिकारी, न्यायालय, तुरुंग सारं आपलं आहे आणि अशांत वातावरणात उपद्रव करणाऱ्यांना समजावून रोखले जाऊ शकते.

आता पाकिस्तानवर नजर टाकू. जर तिथे हिंदू आणि शिखांना सतावले जात असेल तर याला हे प्रत्युत्तर तर असू शकत नाही की भारताच्या मुसलमानांवर अशा प्रकारचा सूड उगवावा. जसे एक सरकार दुसऱ्या सरकारशी करतेत्या सर्व तऱ्हेनेभारताचे सरकार पाकिस्तानच्या सरकारशी हे भांडण सोडवेल. अशा परिस्थितीत हा काही उपाय नव्हे कीताबडतोब तलवारी म्यानातून बाहेर काढाव्यात आणि मुसलमानांवर हल्ला करावा अथवा पाकिस्तानवर हल्ला करावा. शेकडो उपाय आहेत जे उपयोगात आणून भारताचे सरकार पाकिस्तान सरकारवर दबाव टाकू शकते. असे करण्यास वेळ लागतो, धैर्याची गरज असते. जर पाकिस्तानात अशांततापसरली तर पाकिस्तानचे सरकार आपल्याच घरात आपल्यावरच  संकट ओढवून घेईल. पाकिस्तानच्या सरकारने जर पाकिस्तानात हजारो-लाखो लोकांना लुटालूट करण्यापासून रोखले नाही तर ते हजारो लाखो मुसलमान हिंदूंना लुटल्यानंतर आणि त्यांचा विनाश केल्यानंतर पाकिस्तानच्या सरकारवरच तुटून पडतील. ही निराळी गोष्ट आहेकी काही दिवसांकरिता परिणामांचा विचार न करता काही लोक पाकिस्तानात हिंदू-मुस्लीम संघर्ष होत रहावा असा विचार करत असतील परंतु असे झाल्याने तेथे अशी काही अशांतता पसरेल की खुद्द तेथील मुसलमान कायमचे नुकसानीत राहतील. ही बाब पुढे जाऊन समजेल. आता या प्रश्नाच्या काही आवश्यक पैलूंवर आपण थंड डोक्याने विचार करावा.

१४.  असं मुळीच नाही की हिंदू,मुसलमान आणि शिखांमध्ये कुण्या एका धर्माला मानणारे दुसऱ्यापेक्षा चांगले किंवा वाईट असतील. तिघांनाही शांतता हवी आहे, तिघांनाही सुखमय जीवन हवे आहे, तिघेही जीवनाच्या चांगल्या गोष्टींचा आदर करतात. परंतु इंग्रजांनी आम्हाला गुलाम बनवून दरिद्री, बेकार आणि अज्ञानी बनवून ठेवले होते. हे खरंआहे की काही सुखी व शिकलेसवरलेले हिंदू, मुसलमान आणि शीख एवढे अधम आणि नीच बनतात,एवढे कट्टरबनतात. क्रोध आणि घृणेचे असेअवतार बनतात की आपल्या धर्माच्या लोकांपैकी लाखो माणसांना चिथावणी देतात परंतु जर १००% हिंदू,मुसलमान आणि शीख योग्य आणि उच्च शिक्षण प्राप्त करू शकले आणि भारत व पाकिस्तानच्या सरकारच्या मदतीने कामावर लावले गेले आणि सुखी बनवले गेले तर अशा शिकल्या-सवरल्या व प्रतिष्ठेने जीवन जगणार्‍या हिंदू,मुसलमान आणि शिखांना कधी आपसात लढवले जाऊ शकत नाही. शिकल्या-सवरल्यांचे मोठ्यात मोठे भांडण असे रूप धारण करू शकत नाही ज्याचे उदाहरण बंगाल, बिहार, पंजाब आणि देशाच्या इतर भागात दिसून आलेतसे थोडे शिकले-सवरले व संपन्नपरंतु नीच हिंदू,मुसलमान आणिशीख आपल्या मूर्ख आणि आणि अज्ञानी सहधर्मियांना चिथावू शकणार नाहीत. मागील काही दिवसात झालेल्या या भयंकर दंगलीत क्वचितच कुणी चांगला शिकला-सवरलेला हिंदू अथवा मुसलमान अथवा शीख सहभागी झाला असेल. दोष धर्माचा नाही,दोष आहे इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या आमच्या त्या भयानक दशेचा. त्या मूर्खपणाचा, बेकारीचाआणि बेजबाबदार जीवनाचा जी इंग्रजांनी आम्हाला गरजेची बनवून ठेवलेलीहोती. हिंदू,मुसलमान आणि शीख एकमेकांना संपवू शकले नाहीत आणि ह्या तिघांचेही गुण्या-गोविंदाने राहणे आणि प्रतिष्ठेचे जीवन जगणे अशाप्रकारे शक्य बनवले जाऊ शकतेकी संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार रचनात्मक कार्यासलागेल आणि ह्या दहा-पंधरा वर्षाच्या आत देशाच्या जीवनाची रचना केली जाईल, ते घडवले जाईल सुंदर बनवले जाईल, आणि प्रगती केली जाईल. आपण प्रत्येक धर्माला मानणाऱ्याचा आदर केला पाहिजे कारण तो माणूस आहे. अलीकडे भयंकर दंगलींमध्ये सुद्धा शंभरामागे दहा-पाच हिंदू, मुसलमान अथवा शीख सहभागी झाले होते. संपूर्ण समाज मारामारीत उतरलेला नव्हता आणि शेकडो उदाहरणे या गोष्टीची सापडलेली आहेत की, हिंदू, मुसलमान आणि शिखांनी आपला जीव धोक्यात घालून इतर धर्म मानणार्‍यांना आपल्या सहधर्मीयांच्या हल्ल्यापासून वाचवले.सिंधच्या मुसलमानांची अवस्था मी सांगितलीच आहे. आणि ह्या सर्व गोष्टी मी याकरिता सांगत आहे की कोणत्याही समाजाला अथवा कोणताही धर्म मानणार्‍यांना त्याचा धर्म आणि समाजामुळे नीच आणि अधमसमजणे उघड चूक आहे,ही गोष्ट आपल्या हृदयात घट्टझाली पाहिजे.फक्त मूर्खचअसे समजतात. आपण आपली विचारशक्ति, भावना आणि घटनांना विचारांच्या प्रकाशात समजून घेतले पाहिजे. हे खरे आहे की आपल्या भावना आणि विचार बदलल्याने जेवढात्रास होतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीने होत नाही. परंतु जर हा त्रास आपण सहन करू शकत नाही, जर आपण आपल्या अनुचित भावना आणि अनुचित विचार बदलण्याचा त्रास सहन करू शकत नाही तर आपले हेच आनंद देणारे अनुचित विचार आणि अनुचित भावना आपला विनाश करतील.जातीय भावना आणि विचार दिसायला फार सुंदर वाटतात परंतु तेच आपले सर्वात मोठे  शत्रू आहेत. जमातवाद आपल्याला दंश करेल. असाकाही दंश करेल की आपण हलून पाणीही मागू शकणार नाही. या सापाने हुंगलेला कुस सुद्धा बदलत नाही.

१५. १९३७ साली जेव्हा कौन्सिलांच्याआणि विधिमंडळांच्या निवडणूकादेशभर झाल्यातेव्हा देशभरातील मुसलमानांनी काँग्रेसला मदत केली. एवढी की मुस्लिम लीगचे काम करणाऱ्या हजारो लोकांनी काँग्रेसला पूर्णपणे साथ दिली.१९४२ मध्ये महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक झाल्यानंतर देशभरात स्वातंत्र्याची लाट आली आणि एवढे मोठे आंदोलन उभे राहिले की इंग्रजी राज्यसत्तेचे पाय उलथू लागलेतेव्हा इंग्रज गव्हर्नर जनरल, सैन्याधिकारी, मोठमोठे इंग्रज अधिकारी आणि गुलामीप्रियबऱ्याच हिंदू मुसलमान अधिकाऱ्यांकडून हा प्रयत्न करण्यात आला की ह्या आंदोलनाने हिंदू आणि मुसलमान यांमधील लढाईचे स्वरूप धारण करावे. परंतु या कट-कारस्थानाला यश आले नाही. जिन्ना साहेबांनी सुद्धा एकदा नव्हे तर वारंवार या गोष्टींचापुनरुच्चार केला की १९४२ चे आंदोलन मुसलमानांवर हिंदूंचे राज्य स्थापन करण्यासाठी आहे आणि यामुळे मुसलमानांची खूप मोठी हानीहोईल, तरीही देशात एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत मुसलमानांनी स्वातंत्र्याच्या या युद्धात कोणताही अडथळा निर्माण केला नाही,उलट शेकडो तर्‍हेने हा लढा वाढवण्यात मदत केली.

१६. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत हिंदू-मुसलमानांनी बरोबरीने भाग घेतला. सरकारच्या देशी सैन्य दलात जे बंड इंग्रजांच्या विरोधात झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकवण्यात आला,यात लाखो मुसलमान आणि हिंदू एकत्र होते. एवढेच नव्हे तर मुंबईच्या ४० लाख लोकसंख्येला तर असे वाटत होते की इंग्रजी राज्य संपलेआहे. अशाच प्रकारे कलकत्त्याचासंप आणि देशात अनेक ठिकाणी झालेले संप अथवा स्वातंत्र्याची जीआंदोलने झालीत त्या सर्वांमध्ये हिंदू आणि मुसलमान खांद्याला खांदा लावून अत्याचाराचा सामना करतराहिले. आपण तीस कोटी हिंदूव कित्येक लाख शिखांनी मुसलमानांबद्दल वाटेल तसे मत बनवू नये. आपण क्रोध आणि घृणेच्या भावनांवर आपल्या विचारशक्तीचेबलिदान देऊ नये. हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्यामध्ये देशभरात भयंकर दंगली झाल्या आणि घृणेच्या ठिणग्यादेशभर पसरल्या, त्यातच कत्तली आणि खून झालेत. परंतु हिंदू,मुसलमान आणि शिखांमध्ये गुण्या-गोविंदाने राहण्याची आणि जीवनाच्या वाटेवर पुढे जाण्याची शक्ती आहे,या बाबीचा पुरावा असणार्‍या त्या शेकडो घटना आपण विसरू नये. वेगवेगळे धर्म मानणार्‍यांमध्ये जी गुंतागुंत निर्माण झाली आहे ती सोडवण्यासाठी एकमेकांच्या रक्तात बुडालेली बोटे कामी येत नाहीत. (अपूर्ण)

Leave a Comment