The Leaflet

| @theleaflet_in | August 18,2019

५. जमातवादाची भावना आपल्या धर्माकरिता आत्महत्या करण्यासारखी आहे. पहायला तर जमातवादीमाणूस इतर धर्मियांना सुरा खुपसतो परंतु प्रत्यक्षात तो माणूस आपल्याच समाजाचा खून करतो. मग त्याने ते काम दुसऱ्या धर्मियांवर सूड उगवण्याच्या हेतूनेच केलेले का असेना. या देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये हिंदू आणि शीखांसोबत  बऱ्याचशा मुसलमानांनी सूड उगवण्याकरिता केलेले असो अथवा‘इस्लाम जिंदाबाद’ची घोषणा देऊन केलेले असो, जे काही केलेत्यामुळे इस्लामच्या खलिफा आणि इमामांना, इस्लामच्या पवित्र आणि शुद्ध आत्म्यांना आनंद झाला असेल? जमातवाद माणसाला विकृतकरतो. अलीगढमुस्लिम विश्वविद्यालय हे इस्लामी संस्कृतीचे केंद्र समजले जात होते. तेथील विद्यार्थ्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद व अब्दुल मजिद ख्वाजा यांच्यासोबत जी घृणास्पद व घाणेरडी वागणूक केली, त्यामुळे मुसलमान आणि इस्लामला काही लाभ झाला? अशी कृत्ये केल्याशिवाय पाकिस्तान स्थापनहोऊ शकत नव्हता?

६. देशाच्या काही भागात जिथे मुसलमान मोठ्या संख्येत आहेततेथे चूक असो की बरोबर,परंतु एक स्वतंत्र शासन स्थापित व्हावे, असा स्वतंत्र पाकिस्तान ज्याच्या निर्मितीमुळे मुसलमानांना कमी व इंग्लंड-अमेरिकेला जास्त आनंद व्हावा, असे भारतातील मुसलमानांना वाटणे मुसलमानांच्या कितपत फायद्याचे सिद्ध होईल? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, जे काही झालं, आता पाकिस्तान बनला आहे आणि त्याच्या सीमा निश्चित झालेल्या आहे. ज्याला पाकिस्तानला संकटात अडकलेला पाहण्याची अथवा पाकिस्तानच्या सरकारला कमकुवत करण्याची इच्छा असेल, जो पाकिस्तानात राहत असलेल्या हिंदू,शीख आणि बिगर मुसलमानांसाठी स्वर्ग बनण्यात योगदान देत नसेल तो मुसलमान सुद्धा इस्लाम आणि मुसलमानांचा शत्रू आहे. जर पाकिस्तानात हिंदू,शीख किंवा इतर बिगर मुसलमान समाज वसत आहेत किंवा आजपर्यंत वसलेले आहेत त्यांना पाकिस्तानातून पळावे लागले किंवा पाकिस्तानात राहून यातनामय व अपमानजनक जीवन जगावे लागले किंवा पाकिस्तानच्या मुसलमानांपेक्षा त्यांना कमी अधिकार दिले गेले अर्थात त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी विभागात आणि जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी स्थान दिले गेले नाही, त्यांना जर अशी जाणीव करून दिली तर पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या सरकारसाठी हे भयंकर ठरेल. भारतानेपाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानात हिंदू आणि शिखांवरील अत्याचार व अन्यायाचा सूड उगवण्याची मुळी गरजचपडणार नाही.पहिली गोष्ट ही आहे की, संख्येनेजास्त असलेला समाज संख्येने कमी असलेल्या समाजाला मिटवून सुखी होऊ शकत नाही व स्वतःला शक्तिशाली सुद्धा बनवू शकत नाही. आजपर्यंत कोणताही समाज लुटालूट करून प्रगती करू शकलेला नाही. पाकिस्तानात दरिद्री, शेतकरी, कामगार, कारागीर व सर्वसाधारण ऐपतअसणाऱ्या लोकांची संख्या ९९ टक्के आहे आणि यात हिंदू-मुसलमान असा भेद नाही. जर त्या लोकांमधून बिगर मुसलमानांना वेगळे करून लुटले गेले आणि त्यांची शेती-वाडी व त्यांचा व्यवसाय मुसलमानांमध्ये वाटून दिला तर मुसलमानांची विशेष काही प्रगती होणार नाही. जास्तीत जास्त एवढेच होईल की,२०० रुपये प्रतिवर्षऐपत असलेल्या दरिद्री मुसलमानांची ऐपत २९० रुपये प्रतिवर्ष होण्याची शक्यता आहे. परंतु जे राष्ट्र अथवा राज्य धर्माच्या आधारावर कोणत्याही कारणांनेदुबळ्या लोकांना छळते किंवा संपवते त्यालाचोरी, बेईमानी आणि असंस्कृतपणाची कीड लागतेआणि मग त्या राज्याला प्रगती करणे अशक्य होऊन जाते.पाकिस्तानातील शंभरातील २०-२५ हिंदू जर वाईट अवस्थेत आणि बरबाद होण्याच्या परिस्थितीत तिथे ठेवले गेले तर पाकिस्तानची सर्वात मोठी संपत्ती अर्थात लोकसंख्येची शक्तीवाया जाईल किंवा कमी होईल. कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या अधिपत्याखाली राहणाऱ्या कोट्यावधी माणसांना केवळ ते दुसऱ्या धर्माचे पालन करतात म्हणून अज्ञानी, अशिक्षितव दारिद्र्यातठेवले जावे,ही त्या राष्ट्र किंवा राज्यासाठी भयंकर वाईट गोष्ट आहे. कोणत्याही राज्यात माणसाच्या प्रगतीची विभागणी होऊ शकत नाही. प्रजेचे एक अंग कमकुवत होणे हा सर्व लोकसंख्येचा  कमकुवतपणा आहे. दुसर्‍यांना पाडून आपली उन्नती होऊ शकत नाही. त्याच प्रकारे  अन्यायाचे विभाजन सुद्धा अशक्य आहे. पाकिस्तानातील अधिकारसंपन्न आणि प्रभाव गाजवणारे लोक जर हिंदू आणि शीखांसोबत अन्यायाचा व्यापार सुरू करतील तर हे लोक सुद्धा शेवटी मुसलमानांसोबत तसाच अन्यायीव्यवहार करतील.

७.  भारतात पितळ, रेशीम,मुरादाबादी भांड्यांचे काम आणि इतर काम करणाऱ्यांना संपवल्याने कशाप्रकारे हिंदूंनाच हानी पोहोचेल, हे आपण पाहिले आहे. आता असं पहा की,पाकिस्तानात हिंदूंना संपवल्याने कशाप्रकारे मुसलमानांना हानी पोहोचली आणि पोहोचेल. अलीकडे ज्या दंगली झाल्यात त्यात लाहोरमधील धान्याची कोठारे असणाऱ्या बऱ्याच हिंदूंना मारून टाकण्यात आले आणि त्यांची कोठारे लुटली गेली. या कोठारांमध्ये धान्य आणणारे आणि तेथून धान्य घेऊन जाणारे हजारो मजूर मुसलमान होते ते सर्व बेकार झालेत आणि उपासमारीने मरु लागले. लाहोरमध्ये मुसलमान प्रवाशांना सुद्धा उपाशी मरावे लागले कारण त्यांचे बहुतेक काम हिंदू आणि शीखांमुळे चालत होते. कापडाची दुकाने बहुतेक करून हिंदूंची होती ती लूटली गेली आणि अशाप्रकारे लाहोरमध्ये हजारो शिंपी कुटुंबांची उपासमार होऊ लागली. पश्चिम पंजाब मध्ये उर्दू पुस्तके व मासिकांचे खरेदीदार मुसलमानांपेक्षा कितीतरी जास्त हिंदू आणि शीख होते,तेथून हिंदू आणि शीख पळून आल्याने तेथील उर्दू पुस्तके व मासिकांची विक्री ८०टक्के बंद झाली. पूर्व पंजाब आणि दिल्ली येथे पळून आलेल्या हिंदू आणि शिखांनी उर्दू मुद्रणालये सुरु केली आणि उर्दू पुस्तके व मासिके काढलीत. पुस्तके, मासिके आणि मुद्रणालय यांचा व्यवसाय करणार्‍या हजारो मुसलमानांना नुकसानीशिवायकाय मिळाले? ढाक्यातील रेशीम जगभरात प्रसिद्ध आहे परंतु तेथील विणकर बहुतकरून हिंदू आहेत. त्यांना मारून टाकले किंवा पिटाळून लावले तर पूर्व पाकिस्तानला वर्षाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होईल. हजारो हिंदू दुकाने आणि कारखान्यांमध्ये मुसलमान भागीदार होते आणि  मुसलमानांच्या दुकाने आणि कारखान्यांमध्ये हिंदूंचा आणि शिखांचा फायदा होता. हिंदू आणि शिखांनी अनेक मुसलमानांची दुकाने असं समजून जाळून टाकलीत की ती मुसलमानांची आहेत. परंतु हानी झाली ती मुसलमानांसोबतच हिंदू आणि शीख भागधारकांची. मुसलमानांनी कितीतरी दुकाने या समजुतीतून जाळलीत की त्यामुळे हिंदू आणि शीखांची हानी व्हावी, परंतु या दुकानांच्या मुसलमान भागधारकांची सुद्धा हानी झाली. भारतात असो की पाकिस्तानात असो,लुटीच्या वादळाने जो विनाश होतो तो एका धर्माच्या लोकांपर्यंत मर्यादित ठेवलाजाऊ शकत नाही. लुटालुटीतून ज्या अधम लोकांना काही धन मिळते ते लवकरच संपून जाते. समाजाची लुटालूट करणार्‍यांना थोड्याशा धनाला अधिक धनात परिवर्तित करण्याचे ज्ञान नसल्याने ते लवकरच खाण्यापिण्यात संपवून टाकतात. अशाप्रकारे धंदेवाईक गुन्हेगार जमात समाजात जन्माला येते जी आपल्या सहधर्मियांसाठी सुद्धा भयंकर ठरते. पाकिस्तानात ज्या मुसलमान लुटारूंनी आधी हिंदू आणि शिखांना लुटले होते त्यांनीच नंतर मुसलमानांना सुद्धालुटणे सुरू केले.

८. देशात जेव्हा मुसलमानांचे राज्य होते त्यावेळी धन-संपत्ती, जहागीर, अधिकारी आणि बहुत करून छोट्या-मोठ्या नोकऱ्या मुसलमानांकडे होत्या. परंतु तरीही मी आधी सांगितल्याप्रमाणे शंभरात एक-दोन मुसलमान सोडले तर सर्वसाधारण हिंदूंची होती तेवढीचउर्वरित मुसलमानांची अवस्था चांगली किंवा वाईट होती. इस्लामी राजवटीच्या काळात सामान्य मुसलमानांच्या नशिबात अर्धपोटी शिळी भाकर होती आणि घाणीशिवाय दुसरं काहीही नव्हतं. आता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या व पद मिळाले तर यात कोणताही अन्याय नाही व मुसलमानांवर कोणता अत्याचार नाही. परंतु जीवनातसुख, आरोग्य, शिक्षण आणि प्रगतीच्या संधी फक्त सरकारी अधिकारी असलेल्या किंवा मोठ-मोठेव्यापार करणार्‍या मूठभर माणसांना मिळतील असे युग आता राहिलेले नाही. हे युग शेतकरी, कामगार, कारागीर आणि सर्वसाधारण माणसांना वर येण्याचे व प्रगती करण्याचे आहे. आम्ही हे सुद्धा विसरू नये की इस्लामी राजवटीत जर चांगल्या नोकऱ्या १००० होत्या तर आता चांगल्या नोकऱ्यांची संख्या ४० ते ५० हजार पर्यंत पोहोचेल. म्हणून जर इस्लामी राजवटीत १००० मोठमोठे अधिकारी होते तर आता ४-५ हजार मुसलमान मोठे अधिकारी असतील आणि ४०-४५ हजार हिंदू उच्च किंवा चांगल्या पदावर असतील. व्यापार आणिनोकऱ्यांचे प्रमाण आता खूप वाढलेले आहे व आणखी वाढत जाईल आणि मुसलमानांच्या जीवनातील प्रत्येक उणीव भरून निघेल. सरकारी नोकऱ्या व पदव्या केवळ शोभेसाठी व धन संग्रह करण्यासाठी गरजेच्या समजल्या जाणार नाहीत, असे युग आले आहे. प्रत्येक हिंदू-मुसलमान आपल्या योग्यतेनुसार प्रगती करु शकेल. आज पासून ५० वर्षांनंतरचा भारत असा देश असेल ज्यात मोठ-मोठ्या नोकर्‍यांपासून तर मुसलमान कामगार आणि मुसलमान शेतकरीयांनी इस्लामच्या सोनेरी युगात सुद्धा जगले  नसेल असे संपन्न आणि प्रगतिशील जीवन जगताना दिसतील. हीच परिस्थिती हिंदूंची सुद्धा असेल. हितांमध्ये संघर्ष उद्भवणार नाही. एकाचा अधिकार काढून दुसऱ्याला देण्याचा काळ आता राहिलेला नाही. आपण संपत्ती, सुख आणि धनाचे उत्पादन व वितरणाबाबत निराशाजनक विचार करू नये. या निर्माण होणाऱ्या, वाढणाऱ्या  व चालत्या फिरत्या गोष्टी आहेत. धन काही दगड नव्हे, मृत व मर्यादित गोष्ट सुद्धा नाही जी मुसलमानांकडून हिरावून घेऊन हिंदूंना दिली जावी किंवा हिंदूंकडून हिरावून घेऊन मुसलमानांना दिली जावी. ९९ टक्के लोक राजा, सेनापती, मंत्री,जहागीरदार,सावकार किंवा मोठमोठ्या पदावरील एका माणसाला ईश्वर समजत, तो काळगेला आहे. आता प्रत्येक घरसुख आणि आनंदाने भरून जाईल ज्याबद्दल गतकाळातील वआजचे श्रीमंत, सावकार आणि मोठमोठे अधिकारी यांना हेवा वाटेल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही ठिकाणांहून जमीनदारी, तालुकदारी मिटवली जात आहे. सावकार आणि भांडवलदारांची मनमानीव  नफेखोरी यांना आळा घातला जात आहे. आज नाही तर दहा वर्षांनंतर का होईना, मोठमोठे व्यापार सरकारच्या हातात येणार आहेत. अशा परिस्थितीत हिंदु-मुसलमानांचा प्रश्नच कुठे शिल्लक राहतो. दोघांच्याही सुखी असण्याची व आपापल्या संस्कृतीची प्रगती करण्याची संधी फुटीरतावादी व सांप्रदायिक नसलेल्या प्रजा राज्यात साध्य होईल.(अपूर्ण)

Leave a Comment