The Leaflet

| @theleaflet_in | August 25,2019

ज्याप्रमाणे हिंदू आणि शीख गरीब झाल्याने मुसलमान श्रीमंत होऊ शकत नाहीत,नामुसलमानांना गरीब केल्याने हिंदू आणि शीख श्रीमंत होऊ शकत. त्याच प्रमाणे हिंदूंची संस्कृती नष्ट किंवा मृतवत झालयास किंवा युरोप आणि अमेरिकेतील बिगर-मुस्लिमांची संस्कृती संपुष्टात आल्यास किंवा चीन व जपानची संस्कृती नष्ट झाल्यास तर मुस्लिम संस्कृती मुळीच जिवंत राहणार नाही.तसेच भारत,पाकिस्तान किंवा संपुर्ण जगातील मुसलमान असंस्कृत झालेत तर नुकसान होईल, हिंदू धर्म आणि संस्कृती अथवा इतर ठिकाणचे बिगर-मुस्लिम धर्म आणि संस्कृती कमकुवत झाल्याने संपुर्ण जग मुसलमान होईल किंवा इस्लामच्या प्रचाराची संधी मिळेल, असा विचार करणे चुकीचे आहे. बिगर-मुस्लिम संस्कृतीचा कमकुवतपणा इस्लामलासंपुष्टात आणेल.जगातील शेकडा ८०-८५  टक्के लोकसंख्या बिगर-मुस्लिम संस्कृतीनिष्ठ प्रगतीमुळे जी नैतिक आणि बौद्धिक उन्नती करते,तिचा हा प्रसार थांबला तर जगातील शेकडा १५ % मुसलमानांकडून माणुसकीचे ते पडते घर सांभाळले जाणार नाही. गोष्ट अशी आहे की, जगाची संस्कृती जमातवाद आणि कुण्या विशिष्ट धर्माकरिता मृत्यूची चाहूल नसेल तर जीवनाचा संदेश असेल,असे युग आलेले आहे.  हे खरे आहे की, लोक युगानुयुगे स्वतःला हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, शीख, आस्तिक, नास्तिक आणि इतर धर्मावरून संबोधून घेतील,परंतु ते घडले जातील याच संस्कृतीच्या साच्यात.  इस्लाम आणि जगातील मोठमोठे धर्म जे संदेश घेऊन आले होते, ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात  मोठ्या प्रमाणात पुर्ण झाले आहेत. इस्लामच्या पैगंबरांचे संदेश आणि प्रयत्न विरूद्धज्या शक्ती लढत होत्या त्या आता संपलेल्या आहेत. लोक कलमा न पढता अथवा शरीयतनुसार न वागता किंवा इस्लामचे बाह्यावरण पांघरून तो सभ्यपणा आणि संस्कृतीचा तो दृष्टिकोन मान्य केला आहे,ज्यासाठी इस्लाम जन्माला आला होता. इस्लाम हिंदू धर्म किंवा ख्रिश्चन किंवा नास्तिकतेविरुद्धधर्मयुद्ध नव्हते तर असंस्कृत जीवनाच्या विरोधात होता. कलम पढणाऱ्या मुसलमानांव्यतिरिक्त जगातील सर्व समाज वाईट किंवा असभ्य आहेत आणि ते इस्लाम समजून घेण्यात असमर्थ राहतील, असे इस्लामनेकधीही म्हटलेले नाही. ही बाब संकुचित दृष्टिकोन असलेल्या मुसलमानांना समजत नाही. त्यांना जगातील २५० कोटी लोकसंख्या कसेही जीवन जगो, परंतु स्वतःला मुसलमान  समजणे याच्याशी कर्तव्य आहे. आम्ही कलमा पढणारे मुसलमान आहोत हे जगातील १०० % माणसांनी किंवा जास्तीत जास्त लोकांनी म्हणावे, यासाठी इस्लाम जगात मुळीच आला नव्हता. सभ्य आणि सज्जन आहेत आणि त्यांना जात, धर्म आणि देश यात भेद न करता माणसावर प्रेम आहे, असे जगातील १००%  माणसांनी स्वतःला समजावे, यासाठी इस्लाम अवतरला होता.

हम मोअहिहद हैं हमारा केश है तरके रसूम

मिल्लतें जब मिट गयीं अजजाए ईमां हो गयीं

  – गालिब

आणि या समाजाचे अस्तित्व संपुष्टात आले तर जो एक मानव समाज जगात वसेल तो इस्लामी किंवा हिंदू समाज म्हणून ओळखला जावा हे आवश्यक नाही. गालिबच्या शेरमध्ये जो ईमान शब्द आलेला आहे त्याला मुसलमान ईमान समजतात तो ईमान हाच आहे व म्हणून बिगर मुसलमान समजूच शकत नाहीत,असात्याचा अर्थ नाही. ज्या संस्कृतीचा पाया इस्लामने रचला आहे किंवा हिंदू धर्माने रचला आहे किंवा जगातील इतर कोणत्याही धर्माने रचला आहे, त्यात या सुसंस्कृत माणसांना कलमा पढणे  सक्तीचे नाही. जेव्हा येथे ते इंग्रजी राज्य होते तेव्हा येथील शेती-वाडी,  कारागिरी आणि यंत्र कारखाने अर्धमेल्या अवस्थेत होते, आपल्या जीवनाचा आधार संपत होते, आपल्या नसांमध्ये निरोगी रक्त वाहत नव्हते, आपल्या जीवनाची चकाकी आणि उष्मा संपलेला होता. जगभरातील स्वतंत्र देश कोठून कोठे पोहोचलेत,असा तो शंभर-दीडशे वर्षाचा काळ होता. आमचे लक्ष मोठ-मोत्या बाबींकडे जातच नव्हते. राष्ट्र आणि देशाबद्दल योग्य प्रकारे विचार करणे एक-दोन लोक सोडले तर आमच्या समाजातील  शिकल्या-सवरल्या लोकांनाही कठीण झाले होते. सामान्यतः आपले लक्ष लहान-सहान बाबींकडे जात असे. गाई आणि वाद्ये, मोहरम आणि दसरा, ईद आणि होळी. काही लहान-सहान नोकऱ्यांमध्ये शेकडा किती हिंदू आहेत आणि किती मुसलमान आहेत? हिंदी-उर्दूचे भांडण आणि तू-तू मै-मै शिवाय काहीच नसते असे विनाकारणचे धार्मिक वादहोत असत. कोळीष्टकात माशी अडकून राहावी तसे आम्ही या लहान-सहान बाबीत अडकून पडलो होतो. या बाबींसाठी आम्ही आपसात भांडत होतो, खून आणि लुटालूट करत होतो. जर या सडक्या-कुजक्या बाबींमध्ये इंग्रज सरकारने हिंदूंना साथ दिली तर आपण त्याला हिंदू समाजाचा आणि हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्माचा विजय समजत होतो. जर मुसलमानांना साथ दिली तर तो मुसलमान आणि ईस्लाम व ईस्लामी संस्कृतीचा विजय समजत होतो. आपण हा विचार करत नव्हतो आणि करू शकत नव्हतो की, अलीकडे कुणालाही जिंकणे फायद्याचे नाही. कोट्यावधी हिंदू आणि कोट्यावधी मुसलमान उपाशी, निरक्षर आणि दुःखी होते आणि हिंदू किंवा मुसलमान यांचा विजय हा यातना, अपमान, अज्ञान, गरीबी, बेकारी रोगराई आणि जीवनाच्या अनेक समस्या दूर करू शकत नव्हता. देश तडफडूनमरत होता,आणि आपण आपल्या या खऱ्या मातृभूमीला ओळखू नये आणि संभ्रम पसरवणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या भल्याची स्वप्ने पाहावी,ही  इंग्रजी राजवटीची सर्वात भयानक गोष्ट ही होती. आज आपण हिंदू- मुसलमान स्वतंत्र होऊन सुद्धा जर गुलामीचे विचार आणि भावना ठेवू तर आपले स्वातंत्र्य आपल्याला घेऊन बुडेल. राष्ट्र चुकीचे विचार आणि ओझ्यामुळे संपून जाते, दुसऱ्या समाजांच्या हातून नव्हे. या देशात हिंदू मोठा की मुसलमान मोठा, हिंदू राज्य की मुसलमान राज्य, हिंदूंचा विजय झाला की मुसलमानांचा, हा प्रश्नच निर्माण होत नाही ही गोष्ट सत्याच्या प्रकाशात विचार केल्यास  स्पष्ट होईल. संपुर्ण समाजात लहान-मोठी हजारो कामे आहेत, हजारो पदे आहेत. प्रश्न हिंदू-मुसलमानांचा नाही,  प्रश्न तर हा आहे की प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मुसलमानाला संपुर्ण समाजाकडून आणि राज्याकडून खाणे-पिणे लिहिणे-वाचणे आणि तरुण झाल्यावर त्याच्या योग्यते व पात्रतेनुसार व्यवसाय निवडणे, नोकरी व पद मिळवण्याची उत्तम व्यवस्था आहे की नाही. जशी सृष्टी व निसर्ग जगात जेवढे पुरुष जन्माला घालते, जवळ-जवळ तेवढ्याच स्त्रियांना सुद्धा जन्माला घालते आणि स्त्री व पुरुषांमध्ये कोण जास्त संख्येत आहेत यावर वाद होत नाही. अशाच प्रकारे लोकराज्यात समजूतदार आणि पुरोगामी समाजात हा प्रश्न निर्माण होणार नाही की मोठमोठ्या नोकऱ्या हिंदूंनी मिळवले आहेत मुसलमानांनी, मोठ-मोठे व्यापार, अधिकार आणि मोठ-मोठी पदे हिंदूंना मिळावीत की मुसलमानांना. सुसंस्कृत भारतात या बाबींची व्यवस्था होईल की, मुसलमान आणि हिंदूंना बालपणी उद्योगधंद्यांशी संबंधित असे उत्तम शिक्षण मिळावे. प्रत्येक बालकात काम करण्याची पात्रता निर्माण व्हावी, या शिक्षणात धर्म आणि जमातवादाला कोणतेही स्थान नसावे,उलट विज्ञान आणि कलेचे शिक्षण दिले जाते, त्याच भावनेतून हे शिक्षण दिले जावे. ही भावना धर्म आणि जमातवादापासून मैलोगणती दूर आहे. अशाप्रकारे उत्तम शिक्षण घेऊनच प्रत्येक हिंदू आणि मुसलमान बालक तरूण झाल्यावरआपल्या योग्यतेनुसार मोठ्यात मोठे पदही प्राप्त करावे आणि लहान-सहान पदे प्राप्त करून सुद्धा त्यापासून जास्त लाभ घ्यावा. जर याच गोष्टीवर मुसलमान बालकांना शिक्षण मिळण्याच्या पुर्ण संधी मिळाल्या आणि त्यातून मोठ्या जबाबदारीच्या पदांस पात्र जर दोन हजार मुसलमान बालक तयार झाले तर हे दोन हजार मुसलमान मोठे पद प्राप्त करतील. जर १० लक्ष हिंदू बालकांना संधी मिळाली आणि यातील २००० पेक्षा कमी बालके मोठ्या पदास  योग्य निघालेत तर हिंदू बहुसंख्य असून सुद्धा मुसलमानांच्या त्यांना नोकर्‍या कमी संख्येत मिळतील परंतु दिवस-रात्र मोठमोठी पदे आणि मोठ्या नोकऱ्या यांच्या येणे किंवा व्यवसायातून फायदे होतात ते होऊ शकणार नाहीत.    याचीलालसा बाळगणे हे आपल्या समाजाचे हित पाहणे नव्हे. शेकडा ९९ टक्के हिंदू-मुसलमान बालके यासाठी जन्माला येत नाहीत की,तीमोठ-मोठ्या पदांवर असावीत किंवा त्यांनी मोठ-मोठे सावकार बनावे, शेतीकाम,  मजुरी चांगल्या आणि किरकोळनोकऱ्या ही अशी कामे आहेत ज्यात शेकडा९९ हिंदू-मुसलमान पुढे येतील  आणि जीवनाच्या प्रगतीमुळे समृद्ध होतील. जेथवर मोठ-मोठ्या नोकऱ्यांचा प्रश्‍न आहे,तर त्याचा सन्मानजनक आणि हिंदू मुसलमान दोघांनाही एक सारखा फायदा पोहचवणारा तोडगा हाच आहे की कोणी हिंदू किंवा मुसलमान खरोखरच एखाद्या मोठ्या पदास पात्र आहे तर त्याला धार्मिक कारणाने त्या पदापासून वंचित ठेवले जाऊ नये. शिक्षण किंवा परीक्षा किंवा नोकरी देण्याच्या बाबतीत ही गोष्ट येऊ नये की त्यापैकी कुण्या एका धर्माच्या माणसाला दुसर्‍या ध्रमाच्या माणसाच्या तुलनेत सहज व फायदेशीर होईल. असे होऊ नये की कुणी मोठा अधिकारी होण्याची पात्रता बाळगत असताना सरकारच्या डावपेचांमुळे कमी पात्रता असणार्‍याला ते पद दिले गेले. जात-पात आणि धर्माच्या आधारावर कुणी एक धर्म मानणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दुसरा धर्म मानणाऱ्या कमी लोकसंख्येच्या तुलनेत सहजपणे मोठी- लहान नोकरी मिळण्यापासून वंचित ठेवू नये. प्रगत भारतात मोठे पदांवर जेवढे मुसलमान असतील तेवढे मुसलमान ना खलिफांच्या काळात मोठ्या पदांवर होते, ना औरंगजेबाच्या काळात, ना मोठ्यात मोठ्या ईस्लामी राजवटीत आणि हिंदू सुद्धा मोठ्या पदांवर असतील जेवढे रामराज्यात मोठ्या पदावर नव्हते. अशाचप्रकारे ख्रिश्चन, पारशी आणि शीख सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या पदांवर असतील. जर आपण लोकराज्याचा सिद्धांत या देशात जिवंत ठेवला तर जास्त लोकसंख्या असणारे लोक कमी लोकसंख्या असणाऱ्यांना कधी दडपू शकणार नाहीत आणि कमी लोकसंख्या असणारे चुकीचे आणि अयोग्य व खोट्या फायद्यांची स्वप्ने पाहणार नाहीत.

Leave a Comment