सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक छळ केला – सर्वोच्च न्यायालयाची माजी महिला कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीस कार्यालयाने फेटाळले आरोप

[dropcap]स[/dropcap]र्वोच्च न्यायालायाच्या एका माजी कर्मचारी महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ व पदाच्या दुरुपयोगाचे अत्यंत खळबळ जनक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तिने सर्वोच्च न्यायालयातील सर्व २२ वरिष्ठ न्यायाधीशांना शपथपत्र पाठवून लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. सरन्यायाधीशांनी मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यास विरोध केल्यामुळे तिचा छळ केला जात आहे असा तिचा सरळ आरोप आहे. 

आठ वर्षाच्या मुलीची आई असलेल्या या पस्तीस वर्षीय महिलेने त्या तातडीच्या पत्राद्वारे दिल्ली पोलीसांकडून कोणत्याही प्रकारच्या बळजबरीच्या कारवाईपासून तत्काळ संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यात तिने असाही दावा केला आहे की, तिच्या व तिच्या कुटुंबियांच्या जीवांस गंभीर धोका आहे.

 ‘द लिफ्लेट’कडून पाठवण्यात आलेल्या प्रश्नावलीस प्रतिसाद देताना सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस यांनी आरोप फेटाळत ‘ते पूर्णपणे खोटे व अश्लाघ्य” असल्याचे म्हणत त्यांनी सन २०११ मध्ये तक्रारकर्त्याविरुद्ध दाखल झालेली एफ.आय.आर. व २०१२ च्या दैनंदिन रोजनिशीत (पोलीस स्टेशन) असलेली नोंद याकडे लक्ष वेधले.

सरचिटणीसांनी केलेल्या वरील आरोपाच्या अनुषंगाने तक्रारकर्त्या महिलेने आपले निवेदन आज प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये तिने असे म्हटले आहे की, शेजाऱ्यासोबतच्या किरकोळ वादाशी संबंधित २०११ ची एफ.आर.आय. ५ सप्टेंबर २०१६ रोजी रद्द करण्यात आली आहे.  

त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे १२ डिसेंबर २०१८ रोजी पिडीत महिलेस एक थातुरमातुर चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने नोकरीतून बरखास्त केले. एवढेच नव्हे, तर दिल्ली पोलीस दलात हवालदार पदावर असलेला तिचा पती व दीर यांनाही नोकरीतून बरखास्त करण्यात आले. अखेरीस, काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या तिच्या दुसऱ्या दिरालाही अचानक कामावरून कमी करण्यात आले.

 

न्यायाधीश गोगोई यांच्या न्यायालयात नियुक्ती

 

 

         २०१४ च्या मे महिन्यात, सदर महिलेची नियुक्ती न्यायालयाची कनिष्ठ सहायक म्हणून करण्यात आली व त्यानंतर एक कनिष्ठ सहाय्यक सुटीवर असल्याने ऑक्टोबर २०१६ मध्ये तिची प्रतिनियुक्ती न्यायाधीश गोगोई यांच्या न्यायालयात करण्यात आली. तिने दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक कागदी पुरावे, छायाचित्रे, ध्वनिफिती, चित्रफिती यांच्या आधारे हे आरोप केले आहेत व त्यात तिने असेही लिहिले आहे की, ‘त्या दरम्यान माझ्या कामात, न्यायालयाच्या शिरस्तेदारांना सुनावणी दरम्यान आवश्यक असलेली पुस्तके, न्याय निवाड्याच्या प्रती वाचनालयातून पुरवण्याचे काम समाविष्ट होते.’

 

ते मला वारंवार म्हणायचे की एकदा ते सरन्यायाधीश झाले की ते मला मदत करु शकतील आणि मी त्यांना सांगावे की मला काय पाहिजे. आणि ते मिळवून देण्यासाठी ते कसे मदत करू शकतील.

लैंगिक छळ होण्याआधीचा घटनाक्रम कथन करताना ती त्यात लिहिते की, “न्यायाधीश गोगोई यांच्या रहिवासी कार्यालयात काम करीत असताना ते मला वारंवार म्हणायचे की एकदा ते सरन्यायाधीश झाले की ते मला मदत करु शकतील आणि मी त्यांना सांगावे की मला काय पाहिजे. आणि ते मिळवून देण्यासाठी ते कसे मदत करू शकतील, हे ते पाहतील.”

तिने पुढे सविस्तर लिहिले आहे की, न्यायाधीश गोगोई यांनी तथाकथित रीत्या तिच्या कुटुंबाला त्यांच्या घराजवळ निवासाची व्यवस्था देऊ केली होती. “मी त्यांना सांगितले की माझ्या कुटुंबाची परिस्थिती बऱ्यापैकी छान आहे… त्या संभाषणा दरम्यान मी नमूद केले की, केवळ माझा लहान दीर अपंग असल्याने नोकरी मिळवू शकत नाही. त्यावर न्यायाधीश गोगोई यांनी आश्वासन दिले की ते एकदा सरन्यायाधीश झाले म्हणजे त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री मध्ये विशेष  कोट्यातील नियुक्त्या करण्याचे अधिकार येतील.”

ती पुढे असेही नमूद करते की, न्यायाधीश गोगोई यांच्या सरन्यायाधीश पदाच्या शपथ ग्रहण समारोहामध्ये तिला व तिच्या पतीलाही आमंत्रित करण्यात आले होते.

 

न्यायाधीशांच्या विशेष कोट्यामधून कुटुंबातील एका सदस्याची नियुक्ती केली जाते.

 

 

         काही दिवसांनतर तिच्या दीराला मुलाखतीसाठी बोलावले जाते व ‘न्यायालय सेवक’ या गट ‘ड’ वर्गाच्या पदावर सरन्यायाधीशांच्या विशेष कोट्यातून सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती देण्यात येते.        

“दि. १० आक्टोबर २०१८ रोजी सकाळी सरन्यायाधीशांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले व डेस्कसमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगितले. सरन्यायाधीशानी सांगितले की, तुझ्या दीरास नोकरी देण्यात आली आहे जो दोन्ही पायाने साठ टक्के अपंग आहे. त्याच्या लघवीच्या तपासणीत रक्ताचे अंश आढळून आल्याने तो वैद्यकीयरित्या अकार्यक्षम असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही त्याला नियुक्ती दिली जाईल याची त्यांनी खात्री करून घेतली आहे.”

त्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असल्या कारणाने मी नारंगी कुर्ता व दुपट्टा परिधान केलेला होता. सरन्यायाधीशांनी माझ्या कपड्यांना उद्देशून म्हटले, तू आज फार छान दिसत आहेस! त्यानंतर ते त्यांच्या खुर्चीतून उठले व माझे हात आपल्या हातात घेउन म्हणाले की तुझ्या हातांचा गंध फार छान आहे.. सरन्यायाधीशांनी त्यांचे हात हळूच माझ्या डोक्याच्या मागून खालपर्यंत पाठीवर फिरवले….

 

तू माझ्यासाठी काय करू शकतेस?

 

 

लैंगिक छळाच्या घटनांचे वर्णन करताना ती पुढे नमूद करते की, “मी साधारणतः माझा काळ्या व पांढऱ्या रंगाच्या गणवेषातच असते परंतु त्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असल्या कारणाने मी नारंगी कुर्ता व दुपट्टा परिधान केलेला होता. सरन्यायाधीशांनी माझ्या कपड्यांना उद्देशून म्हटले, तू आज फार छान दिसत आहेस! त्यानंतर ते त्यांच्या खुर्चीतून उठले व माझे हात आपल्या हातात घेउन म्हणाले की तुझ्या हातांचा गंध फार छान आहे… नंतर सरन्यायाधीशांनी मला विचारले की, तू माझ्यासाठी काय करू शकतेस? मी त्यांना वारंवार म्हणत राहिले की, मी अत्यंत कृतज्ञ असून माझ्या कुटुंबातील सर्वच जण खूप आनंदी आहेत. त्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांचे हात हळूच माझ्या डोक्याच्या मागून खालपर्यंत पाठीवर फिरवले. मी एकदम स्तब्ध झाले आणि माझे सर्व शरीर ताठरून गेले. मला वाटते की, सरन्यायाधीशांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ लहान बाळाचे ओढतात तसे माझे गाल ओढले. ते मला असेही म्हणाले की, त्यांच्या मुलीसोबतही ते असेच करतात.”    

त्या नंतर तत्काळ सरन्यायाधीश तिथून निघून गेले. मी अवाक झाले होते, गांगरले होते. माझ्या लगेच लक्षात आले की सरन्यायाधीशांनी मला अत्यंत अनुचित प्रकारे स्पर्श केला… मी अवाक होते, गांगरले होते की सरन्यायाधीशाच्या उंचीच्या व्यक्तीने असा काही प्रकार करावा!

 

 

 

धक्कादायक व अनुचित वागणुक         

 

 

तिच्या म्हणण्यानुसार, ११ आक्टोबर २०१८ रोजी सकाळी सरन्यायाधीशांनी तिला पुन्हा घरी बोलावले “तू जर थोडे वजन वाढवलेस तर सुंदर दिसशील.” अशी टिप्पणी केली  व नंतर  माझ्या दीराला नोकरी दिल्याच्या बदल्यात लैंगिक लगटीची मागणी केली.

त्यांनी मला कंबरेभोवती आलिंगन घातले आणि ते त्यांच्या हाताने माझ्या संपूर्ण अंगाला स्पर्श करू लागले. त्यांनी त्यांच्या शरीराचा भार माझ्या शरीरावर टाकला आणि ते (मला) जाऊ देत नव्हते… ते मला आलिंगन देण्याचे थांबत नसल्यामुळे मला त्यांना हाताने धक्का द्यावा लागला. मी त्यांना जोराने धक्का देउन दूर केले तेव्हा त्यांचे डोके पुस्तकाच्या कपाटाला लागले.

“त्यांनी (सरन्यायाधीशांनी) सुरुवातीला माझ्या गालाचा चिमटा घेतला. नंतर त्यांनी त्यांचे हात समोरून माझ्या कंबरे भोवती टाकले व म्हटले, ‘मला तुझ्याकडून हे पाहिजे.’ त्यांनी मला कंबरेभोवती आलिंगन घातले आणि ते त्यांच्या हाताने माझ्या संपूर्ण अंगाला स्पर्श करू लागले. त्यांनी त्यांच्या शरीराचा भार माझ्या शरीरावर टाकला आणि ते (मला) जाऊ देत नव्हते… ते मला आलिंगन देण्याचे थांबत नसल्यामुळे मला त्यांना हाताने धक्का द्यावा लागला. मी त्यांना जोराने धक्का देउन दूर केले तेव्हा त्यांचे डोके पुस्तकाच्या कपाटाला लागले.” ती पुढे म्हणते की, “मी तत्काळ त्या खोलीतून बाहेर पडले, त्यावेळी मी पूर्णपणे हादरून गेले होते व स्पष्टपणे विचार करण्यास असमर्थ झाले होते.

‘…लिही, की तु हे जाहीर करणार नाहीस.’ माझ्या हातात एक कागद आणि पेन्सिल होती, त्यांनी जसे सांगितले तसे मी लिहिले, ‘जर तुम्ही मला आलिंगन करू दिले तर मी तुमची प्रतिष्ठा मलिन करणार नाही…’

 

साधारणतः १० ते १५ मिनिटा नंतर “सरन्यायाधीशांनी मला पुन्हा त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि म्हटले की, ‘येथे जे काही घडले ते तु कोणालाही सांगणार नाहीस.’ मी एवढी अस्वस्थ आणि घाबरलेले होते की, मी ‘Yes, of course your lordship. असे म्हटले. त्यानंतर  ते मला म्हणाले, ‘लिही, की तु हे जाहीर करणार नाहीस.’ माझ्या हातात एक कागद आणि पेन्सिल होती, त्यांनी जसे सांगितले तसे मी लिहिले, ‘जर तुम्ही मला आलिंगन करू दिले तर मी तुमची प्रतिष्ठा मलिन करणार नाही.’

ती पुढे लिहिते “मी अत्यंत घाबरले होते. ते मला जे लिहायला सांगत आहेत ते चुकीचे आहे हे मला समजत होते. आलिंगन देण्याचा प्रयत्न मी केला, असं ते भासवण्याचा प्रयत्न करीत होते”

 

पोलीस व न्यायालयीन कर्मचारी वृंदामार्फत करण्यात आलेल्या अवांछित चौकशा आणि देण्यात आलेल्या धमक्या

 

 

         तिने  दिलेल्या शपथपत्रात पुढे ती असेही म्हणते की, घरी पोहचल्यानंतर तिला वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकारी विभागाकडून वारंवार फोन येत होते व त्यामध्ये तिच्या बऱ्या वाईटाची चौकशी करतानाच तिच्या वैयक्तिक जीवनाबाबतही चौकशी केली जात होती.’

         “त्या रात्री जेव्हा मी सावरले आणि स्पष्ट विचार करण्याच्या स्थितीत आले तेव्हा मी सरन्यायधीशांना फोन केला. कारण मला त्यांना सांगावयाचे होते की, यापुढे मी त्यांच्यासोबत काम करु शकणार नाही. त्यांनी माझा फोन उचलला नाही. त्या ऐवजी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सचिवास फोन करायला लावून मला कळवायला सांगितले की, न्यायाधीश गोगोईंना रात्रीच्या वेळेला त्रास देवू नका. जेव्हा की आतापर्यंत मला वेळी अवेळी फोन करणे, whatsapp करणे सामान्य होते.” घटनाक्रमात सांगताना ती पुढे म्हणते की, टिळक मार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सुद्धा तिच्या व तीच्या कुटुंबीयांबाबत चौकशी केली, हे तिला नंतर कळले.

दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीशांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घटना कोणाकडेही उघड केली तर कुटुंबाला हानी पोहचवण्याची धमकी दिली.

त्यानंतर सरन्यायाधीशांनी तिला आपल्या खाजगी कक्षात नेहमी इतके बोलावण्याचे जरी थांबवले तरी जेव्हा केव्हा आत बोलवत, तेव्हा तेव्हा एक शिपाई उपस्थित ठेवण्याचा आग्रह करत. “एकदा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयीन कक्षात बोलावले मला म्हटले की, मी पुन्हा पूर्वीप्रमाणेच  नियमित गुड मॉर्निंगचे संदेश पाठवावेत व मी आधीसारखेच वागणे व काम करणे सुरु ठेवावे.

 

 

 

मनमानी बदल्या

 

 

         न्यायाधीश गोगोई यांच्या हातून घडलेल्या तथाकथित ‘लैंगिक छळ व परिणामी उत्पिडना’च्या घटनेच्या तीन आठवड्याच्या कालावधीत तिला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये बदली देण्यात आली आणि सरतेशेवटी अत्यंत ‘लेच्यापेच्या कारणा’वर बडतर्फ करण्यात आले.

सतत होत असलेल्या बदल्यांदरम्यानच तिला निबंधकांची, एक दिवस विनापरवानगी सुटी घेतल्याबद्दल, नोटीस व ज्ञापन शाखा अधिकारी (प्रशासन M) यांच्या मार्फत देण्यात आले. जिचा सरतेशेवटी एकतर्फी विभागीय चौकशी, नंतर निलंबन व अंतिमतः बडतर्फीत शेवट झाला.

निबंधकांनी दिलेल्या ज्ञापनात तिच्यावर असा आरोप करण्यात आला होता की, तिने बैठक व्यवस्थेबाबत असंतोष व्यक्त केला व शाखा अधिकाऱ्याकडे चौकशी केली की, तिला प्रशासकीय साहित्य विभागात का बसवले जात आहे. त्यांत असाही आरोप करण्यात आला होता की, ती अस्विकार्य वर्गाच्या माधमातून बसण्याची जागा बदलून मिळण्यासाठी प्रभाव आणण्याचं प्रयत्न करीत होती. तिसरा आणि शेवटचा आरोप असा की, ती ११ नोव्हेंबर २०१८ रोजी कामावर अनुपस्थित होती.

वरिष्ठांना दिलेल्या लेखी उत्तरात तिने स्प्ष्ट नमूद केले आहे की, ‘तीन आठवड्याच्या काळामध्ये तीन वेगवेगळे पदभार दिल्यामुळे मी अत्यंत चिंताग्रस्त झाले होते व आपल्या कामगिरीबद्दल खूप असुरक्षित वाटत होते… आणि म्हणुनच मी सर्वोच्च न्यायालय कर्मचारी कल्याण संस्थेकडे गेले. मी कुठे काही चुकले का याचा शोध घ्यावा एवढी एक विनंतीमात्र मी त्यांना केली होती.’

‘(चार वर्षाच्या सेवेदरम्यान) मी अत्यंत मेहनतीने व निष्कलंक असे काम केलेले आहे. माझ्या वार्षिक गोपनीय अहवालानुसार २०१४-१५ या काळात माझी सेवा ‘चांगली’ आणि २०१५-१६ मध्ये ‘अतिशय चांगली’ या श्रेणीमध्ये नोंदण्यात आली आहे.’

        ११ नोव्हेंबर २०१८ च्या अनुपस्थितीविषयी तिने दावा केलाय की, तिला तिच्या मुलीच्या शाळेला भेट देणे आवश्यक होते, जे की स्वाभाविक आहे. ‘(चार वर्षाच्या सेवेदरम्यान) मी अत्यंत मेहनतीने व निष्कलंक असे काम केलेले आहे. माझ्या वार्षिक गोपनीय अहवालानुसार २०१४-१५ या काळात माझी सेवा ‘चांगली’ आणि २०१५-१६ मध्ये ‘अतिशय चांगली’ या श्रेणीमध्ये नोंदण्यात आली आहे.’

         तथापि तिने वरिष्ठांना दिलेल्या आपल्या लेखी उत्तरात बिनशर्त माफी मागितल्याचेही ती सांगते.

१७ डिसेंबर रोजी चौकशी सुरु होण्याची वाट बघत असताना ती भोवळ येउन कोसळली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी राम मनोहर लोहिया इस्पितळात तिला तत्काळ भरती केले. अशा परिस्थितीती उद्भवल्याने ती विभागीय चौकशी समितीसमोर उपस्थित होऊ शकली नसतानाही २१ डिसेंबर २०१८ रोजी ‘गैर वर्तणूक व आज्ञा झुगारणे” या दोषारोपावर तिला बडतर्फ केले गेले. 

 

कुटुंबियांचा छळ

 

 

         तिने आपल्या शपथ पत्रात पुढे असे म्हटले आहे की, दिल्ली पोलीस विभागात हवालदार म्हणून कार्यरत असलेला तिचा पती व दीर यांना देखील नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. ‘२ जानेवारी २०१९ रोजी माझे पतीला विकास पूरीचे पोलीस उपायुक्त यांचा आदेश प्राप्त झाला. ज्यात असे म्हटले होते की, भारताच्या सरन्यायाधीशाच्या कार्यालयास त्यांनी अवांछित फोन केले, जे की कार्यालयीन गैर वर्णुकीत मोडतात. आणि म्हणून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.’ ती पुढे असे नमूद करते की, ‘९ जानेवारी रोजी विकास पूरीचे पोलीस उपायुक्त यांचा  आदेश प्राप्त झाला. ज्यामध्ये असे नमूद होते की, माझे पतीचे स्थानिक जुगाऱ्या सोबत तथाकथित संबंध आहेत. त्या आदेशात असेही नमूद केले होते की, माझ्या पतीच्या व त्याच्या भावाच्या विरोधात २०१२ मध्ये एक फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.’

         तथापि ती असा दावा करते की, त्या गुन्ह्याशी निगडीत एफ.आय.आर. तक्रारकर्ता आणि तिचा पती व त्याचा भाऊ ह्यांच्यामधील आपसी समझोत्यातून १२ जानेवारी २०१७ रोजी कम्पाउंड झालेली आहे.

         जानेवारी २०१९ मध्ये अपंग असलेला तिचा लहान दीर, ज्याला  गट ‘ड’ वर्गाच्या पदावर नियुक्ती देण्यात आली होती, त्याला अचानकपणे बडतर्फ करण्यात आले.

 

 

नाक घासून जा

 

 

…टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी तिला व तिच्या पतीला बोलावून घेतले आणि त्यानंतर मारूती स्विफ्ट कारमध्ये बसवून सरन्यायाधीशांच्या घरी घेउन गेले, त्या वेळेला ते पोलीस साध्या पोशाखात होते. ‘तेथे सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक आधीपासूनच उपस्थित होते. ते मला सरन्यायाधीशांच्या घरामधील दिवाणखान्यात सौ. गोगोई यांच्याकडे  घेउन गेले. ठाणेदार व निबंधक यांच्या उपस्थितीत सौ. गोगोई यांनी मला म्हटले की, नाक घासून जा.’

         पुढे तिने असा आरोप केला आहे की, टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी तिला व तिच्या पतीला बोलावून घेतले आणि त्यानंतर मारूती स्विफ्ट कारमध्ये बसवून सरन्यायाधीशांच्या घरी घेउन गेले, त्या वेळेला ते पोलीस साध्या पोशाखात होते. ‘तेथे सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक आधीपासूनच उपस्थित होते. ते मला सरन्यायाधीशांच्या घरामधील दिवाणखान्यात सौ. गोगोई यांच्याकडे  घेउन गेले. ठाणेदार व निबंधक यांच्या उपस्थितीत सौ. गोगोई यांनी मला म्हटले की, नाक घासून जा.’ आतापर्यंत माझ्या लक्षात हे आले होते की सरन्यायाधीशांनी लैगिक छाळाबाबत एक खोटी कथा रचली आहे. हेच कारण आहे की, त्यांनी मला त्या टिपणामध्ये लिहायला लावले होते की मी त्यांना अलिंगन देऊ पाहत होते. जेव्हा की, त्यांनी स्वतः माझ्यासोबत शारीरिक व लैंगिक लगट करण्याचा प्रयत्न केला होता.

         ‘तथापि त्या वेळेला मला केवळ एकचगोष्ट हवी होती, ती म्हणजे स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला वाचवणे. मी सौ. गोगोई यांच्या पायात पडले, त्यांच्या पायावर नाक घासले आणि सॉरी म्हटले. आणि मग आम्ही तेथून निघून गेलो. त्या वेळेला घराच्या दिवाणखान्यात सरन्यायाधीश उपस्थित नव्हते.’

         परंतु त्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये अशी अफवा पसरली होती की, तिने बडतर्फीनंतर आत्महत्या केली.

 

 

 

छचोर एफ.आय.आर., बेकायदेशीर अटक, बेड्या आणि कुटुंबावर हल्ला

 

 

         तिच्या सांगण्यानुसार, त्यानंतर ३ मार्च २०१९ रोजी टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तिच्या विरूद्ध भा.दं.वि. ४२०, ५०६, १२० ब अंतर्गत ‘खोटी आणि छचोर’ एफ.आय.आर. नोंदवण्यात आली. एफ.आय.आर. मध्ये असा आरोप आहे की २०१७ साली एका झज्जर येथे राहणाऱ्या तक्रारकर्त्या व्यक्तीस नोकरी मिळवून देण्यासाठी त्याच्या कडून सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात ५० हजार रुपये रोख तिने घेतले.

‘तिला पकडून आणल्यानंतरही पोलिसांनी तिच्या सासूला मारहाण केली. तसेच तिचा पती, दीर व दीराची पत्नी यांना बेकायदेशीररीत्या कोठडीत डांबून ठेवले’

   पोलिसांनी केलेल्या अत्याचाराबाबत समजावून सांगताना ती लिहिते की, ‘८ मार्च २०१९ रोजी दिल्लीहून आलेल्या पोलिस पार्टीने तिच्या राजस्थान येथील वडिलोपार्जित घरात धुमाकुळ घातला. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला व तिच्या पतीला टिळक मार्ग पोलीस ठाण्यात आणले गेले.’ ती दावा करते की, ‘तिला पकडून आणल्यानंतरही पोलिसांनी तिच्या सासूला मारहाण केली. तसेच तिचा पती, दीर व दीराची पत्नी यांना बेकायदेशीररीत्या कोठडीत डांबून ठेवले.’ वैद्यकीय अहवाल दाखवत ती म्हणते की, ‘त्याच दिवशी तब्येत बिघडल्यामुळे तिला तत्काळ इस्पितळात भरती करावे लागले.’

 

“त्या रात्री उशिरा मला अटक करण्यात आली. माझ्या पायात बेड्या टाकल्या गेल्या… माझ्या पतीला (अटक केली नसतानाही) हातकड्या टाकून कोठडीत मारहाण करण्यात आली…”

 

         “त्या रात्री उशिरा मला अटक करण्यात आली. माझ्या पायात बेड्या टाकल्या गेल्या… माझ्या पतीला (अटक केली नसतानाही) हातकड्या टाकून कोठडीत मारहाण करण्यात आली. मला एका दिवसासाठी पोलीस कोठडीत व आणखी एक दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. परिणामी मला जामीन मिळवावा लागला. आता पोलिसांनी माझा तो जामीन रद्द करावा यासाठी अर्ज केला आहे.”

         “माझी बडतर्फी,  माझ्या पतीचे व दीराचे निलंबन आणि माझ्या अपंग दीराची बडतर्फी हे सर्व पार पाडण्यासाठी सरन्यायाधीशांनी आपल्या पदाचा, कार्यालयाचा, अधिकाराचा, वलयाचा आणि शक्तीचा नियोजनबद्ध रित्या गैरवापर करून मला घाबरवण्यासाठी व सरन्यायाधीशांनी केलेल्या माझ्या लैंगिक छाळाबाबत मी कोठेही वाच्यता करू नये यासाठी केलाय.”

         ‘माझा सुरु असलेला छळ आणि दिल्या जात असलेल्या यातना हे मला नियोजनबध्द रित्या पिडून माझे व माझ्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक नाश करण्याच्या हेतूने केले जात असल्याचा’ ती विलाप करते.

 

 

 

तिचा मदतीसाठीचा टाहो

 

 

         तिने प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंग यांना पत्र तर पाठवलीच आहेत, सोबतच तिने दिल्ली महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांना तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. “त्या क्षणापर्यंत मी लैंगिक छळा बद्दल बोलण्याचे टाळले, कारण मी अतिशय भयभीत होते आणि मला सरन्यायाधीशांना राग येऊ द्यायचा नव्हता आणि मला माझ्या कुटुंबाला आणखी अडचणीत आणायचे नव्हते.” ती पुढे म्हणते “परंतु आता असं दिसत की हा छळवाद, हि पिळवणूक आणि हा त्रास जो पर्यंत मी यामागील हेतू बद्दल बोलणार नाही तोपर्यंत थांबणार नाही”

       तिने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती केली आहे की तिच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र बाह्य चौकशी समिती गठीत करावी व चौकशी पूर्ण होई पावेतो तिच्या वर टिळक मार्ग पोलीस ठाण्याने नोंदलेले गुन्ह्यामधील प्रक्रिया थांबवावी तसेच तिचा बडतर्फीचा आदेश देखील स्थगित करावा.

         तिच्या अपंग दिरास सुद्धा नोकरीवर पूर्ववत घ्यावे, तसेच पती व त्याच्या भावाचे निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे, याची देखील मागणी तिने केली आहे.

 

 

 

सर चिटणीस कार्यालयाचा प्रतिसाद

 

 

‘द लिफ्लेट’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीस कार्यालयाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या वतीने खालील प्रमाणेप्रतिसाद दिला आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सदरहू व्यक्तीस नित्यक्रमाप्रमाणे सर न्यायाधीश यांच्या रहिवासातील कार्यालयामध्ये नियुक्ती दिली होती. ती व्यक्ती कनिष्ठ वर्ग लिपिकच्या समांतर पातळीवर होती. तिच्या सोबतच सर न्यायाधीशांच्या रहिवासी कार्यालयात इतर अनेक कर्मचारी काम करीत होते. तेथे कोणत्याही क्षणी किमान पाच ते सहा कर्मचारी उपस्थित असत.
  • सर न्यायाधीशांच्या रहिवासी कार्यालयात ती अत्यंत कमी काळासाठी काम करीत होती व तिच्या जबाबदाऱ्या पाहता, आणि जसे कळविले आहे, तिला सर न्यायाधीशांसोबत प्रत्यक्षपणे संवाद साधण्याचा प्रसंग आलाच नाही.
  • तिला सेवेतून प्रक्रियेनुसारच बडतर्फ करण्यात आले. तिचा दीर त्या वेळेला केवळ एक तात्पुरता कर्मचारी असल्याने तसेच त्याची वागणुक आणि कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे त्याला बर्खास्त करण्यात आले.
  • सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला अवांछित फोन करणे किंवा विना आमंत्रण येणे हे सर्वांसाठी खुले नाही, विशेषतः अशा कर्मचार्याकडून, ज्याला बडतर्फ करण्यात आले आहे आणि जो आधीच अनुचित वागणुकी मध्ये समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री ने अवांछित फोन आणि निरोप सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला आल्याने एक तक्रार दाखल केली होती. तिच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विरोधात विभागीय चौकशी जर आरंभ केली असेल तर ती दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार केली असेल.

…तिच्या विरोधात एक फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा अत्यंत गंभीर असा आरोप करण्यात आला आहे…

  • या खोट्या व अश्लाघ्य आरोपांचा हेतू हा स्पष्टपणे खोडसाळपणाचा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रात संदर्भ दिला त्यानुसार तिच्या विरोधात एक फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा अत्यंत गंभीर असा आरोप करण्यात आला आहे. तिला पूर्वी मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी एक अर्ज करण्यात आला आहे, जो तिने तक्रारकर्त्याला धमकावल्यामुळे दाखल केल्याचे समजते. तो अर्ज २० एप्रिल २०१९ रोजी सुनावणीसाठी ठेवला आहे.
  • इथे हे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे की, संबंधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तिच्यावर आधी दोन फौजदारी प्रकरणे दाखल झालेली होती. (१) एफ आय आर क्र. ४८४/११ हरीनगर पोलीस स्टेशन, भा.दं.वि. ३२४, ३४१, ३५४, ५०६, ३४; (२) डी डी क्र. ३० ए दिनांक. ५/३/२०१२, भा.दं.वि. १०७/१५०, हरीनगर पोलीस स्टेशन, एसइएम न्यायालय, मोती नगर.
  • सर्वोच्च न्यायालयातील संपुर्ण कार्य काळादरम्यान मग ते सरन्यायाधीशांच्या रहिवासी कार्यालयातील काळात असो किंवा मग, तेथून बदली झाल्यानंतर असो, अथवा जेव्हा तिला बडतर्फ केले तेव्हा असो, अथवा त्यानंतरही कधीच तथाकथित स्वरूपाची तक्रार तिने केलेली नाही. या क्षणाला हे खोटे आरोप करणे हे केवळ खोडसाळपणाचेच नसून पूर्णपणे पश्चातबुद्धीने केलेले काम आहे.
  • वास्तविक पाहता, दुसऱ्या बाजुला, तिच्या विरुद्ध दरम्यानच्या काळात सरन्यायाधीशांच्या सचिवालयाकडून सरचिटणीसांना तिच्या विरुद्ध अनुचित वागणुकीच्या तक्रारी करण्यात प्राप्त झाल्या होत्या, परिणामी सरन्यायाधीशांच्या कार्यालयातून तिची बदली करण्यात आली. सचिवालयाने तक्रारीत औपचारिकरित्या नमूद केल्याव्यतिरिक्त अनुचित वागणुकीच्या अनेक घटना आहेत.
  • असे दिसते की, तिने व तिच्या कुटुंबाने केलेल्या चुकांमुळे कायदेशीररित्या सुरु झालेल्या कारवाईतून बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारचे खोटे आरोप करत, कसेही करून दबाव तंत्र चा वापर करीत आहेत. संस्थेला बदनाम करण्याच्या हेतूने काही खोडसाळ प्रवृत्त्या याच्या मागे असण्याची हि दाट शक्यता आहे.