On 20 May 1951, Dr. Ambedkar addressed a conference on the occasion of Buddha Jayanti organised at Ambedkar Bhawan, Delhi. The Guest of Honour was the then Ambassador of France in India. Shankaranand Shastri is seen on the right in the photograph.

स्वयं प्रकाशित व्हा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

[dropcap]मे[/dropcap] १९५० ची एक आल्हाददायक संध्याकाळ, मुंबईच्या कफ परेड मैदानातील बाकावर दोन महान व्यक्ति गप्पा करत बसले होते. त्यापैकी एक होते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर आणि दुसरे होते सुप्रसिद्ध साहीत्यिक व ‘अस्पृश्य’ या कादंबरीचे लेखक मुल्क राज आनंद. दलितांच्या मुक्तिदात्यासोबत झालेली ही दैदिप्यमान बातचीत.

 

मुल्क राज आनंद: नमस्कार, डॉ. आंबेडकर!

डॉ. बी. आर. आंबेडकर: मी बौद्ध अभिवादन जास्त पसंत करतो- ओम मणि पद्मये! कमळांना जागृत होऊ द्या.

मुल्क राज आनंद: होय, आपणही कसे विचारशून्य लोक आहोत! शब्दांचे अर्थ जाणून न घेताच परंपरेनुसार वाहत असतो. तरीही,  नमस्कारचा अर्थ आहे- मी तुमच्यापुढे नतमस्तक आहे…..

डॉ. बी. आर. आंबेडकर: हेच तर शरणागतीला चिरस्थायी करते! ‘कमळांना जागृत होऊ द्या’- ही ज्ञानोदयासंबंधी प्रार्थना आहे.

मुल्क राज आनंद: अगदी खरं आहे, जुन्या सवयी मोठ्या मुश्किलीने जातात. विचार न करताच आपण त्यांना स्विकारत असतो…..

डॉ. बी. आर. आंबेडकर: प्रत्येक बाबतीत!

मुल्क राज आनंद: जरा विचार करा, कुणी हिंदू म्हणून जन्माला येत नाही! किंवा मुस्लिम म्हणुन, किंवा ख्रिश्चन म्हणून!  हिंदू आई-वडील आपल्या बाळाचा नामकरण विधी करून त्याचे नाव ठेवतात. पुरोहितांकडून संस्कृत मंत्रोच्चाराद्वारे त्याला मान्यता दिली जाते, जे बाळाला समजत सुद्धा नाही. एक पवित्र धागा त्याच्या शरीरावर ठेवला जातो. बस्स, झाला हिंदू!

डॉ. बी. आर. आंबेडकर: ईडियसी! (मुर्खता!)

मुल्क राज आनंद: तुम्हाला म्हणायचंय, ग्रीक शब्दाच्या अर्थानुसार वर्तुळात गोल गोल फिरणारा ‘इडियट’!

डॉ. बी. आर. आंबेडकर: या सर्व जुन्या सवयी, आचार-विचारांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत.  शिक्षकांना प्रश्न विचारण्यास शिक्षणाने तरुणांना प्रेरित केले पाहिजे, प्रत्येक दिवशी एक नवा प्रश्न…..

मुल्क राज आनंद: शिक्षकांना शिकवण्याची सर्वश्रेष्ठ पद्धत…..! बहुतेकांना माहीतच नसते की, अभ्यासक्रमात काय नाहीय. हे एक वास्तवही आहे की प्रत्येकच आपल्या तरुणपणात केवळ प्रश्न विचारूनच विकसित होत असतो. मी हे हेनरी बर्गसॉनच्या क्रिएटिव्ह ईव्होल्युशन या पुस्तकातून शिकलो. हेगेल, कांट आणि देकार्त्स यांना वाचल्यानंतर मी किती तरी तत्वज्ञानात्मक प्रश्नांमध्ये अडकून पडलो होतो. बर्गसॉन म्हणतात- ‘तत्वज्ञानाच्या  प्रत्येक  सिद्धांतावर प्रश्न उपस्थित केल्याने आपले ज्ञान विकसित करण्यात यश मिळते’……

डॉ. बी. आर. आंबेडकर:  बुद्धाने ब्राम्हणांशी त्यांच्या प्रत्येक धार्मिक मतांच्या बाबतीत वाद विवाद केला. ब्राम्हणांनी संपूर्ण  जनतेला जातीबाह्य ठरवून हीन म्हटले, आणि पुढे म्हटले, ‘ईश्वराने तुम्हाला वर्ण  दिले आहेत- ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र.’ बुद्धाने विचारले: ‘माणसाबद्दल काय- एक व्यक्ति म्हणुन? कारण मृत जनावरे ओढणार्‍या कुटुंबात जन्मास येणार्‍यांना अस्पृश्य बनण्याची शिक्षा देण्यात येते, हिंदूंच्या नजरेत वनात राहणारे सर्व जंगली…..

मुल्क राज आनंद: नाकरण्यात आले!

डॉ. बी. आर. आंबेडकर: होय! हाताने काम करतो, त्या प्रत्येकाला नाकरण्यात आले होते व आहे. ते जे जनावरांचे चामडे सोलतात! जे शेण काढतात! जे जमिनीवर मानवी श्रम करतात! या सर्वांवर कलंक लावून नेहमीकरिता वेठबिगार बनवण्यात आले. पाच हजार वर्षांनंतरही अजूनही अवस्था वाईट आहे. स्नान करून आलेला अस्पृश्य मंदिरात प्रवेश करू शकत नाही! तो गावातील विहीरीतून पाणी काढू शकत नाही- त्याने गावाच्या बाहेरील घाण खड्ड्यातूनच पाणी घेतले पाहिजे! तो त्याची जनावरे जमीनदाराच्या जमिनीवर चारू शकत नाही! तो गलिच्छ आहे, कारण तो घाण साफ करतो. त्याला नेहमीसाठी अपवित्र मानले जावे! एका जाणवराला स्पर्श केला जाऊ शकतो, परंतु अस्पृश्य माणसाला नाही…..

मुल्क राज आनंद: घटना सभेचे सदस्य या नात्याने तुम्ही व्यक्तीच्या हिताचे रक्षण करू शकलात?  मी हे पाहिले आहे की तुमच्या समितीने मुलभूत अधिकार बहाल केले आहेत- व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार. परंतु आम्ही हेही पाहीले आहे की तुम्ही संपत्तीच्या अधिकारालाही मूलभूत अधिकार म्हणुन मान्यता दिली आहे…… हे परंपरागत संपत्तीवान समाजाला निर्णायकपणे सत्तारूढ बनण्याची संधी प्रदान करीत नाही? आणि गरीबात गरीब व अस्पृश्यांना नेहमीसाठीच नुकसानीच्या खाईत ढकलत नाही?

डॉ. बी. आर. आंबेडकर: आपल्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता, समाजवादी लोकशाही सिद्धांतातील मुल्ये पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे… जर राज्यांकडून प्रत्येकाला वहिवाटीचा अधिकार मिळत असेल तर विशेषाधिकारांमध्ये समानतेची हमी मिळू शकते आणि त्यांच्या शोषणाची कोणतीही शक्यता नाही. अस्पृश्य आणि बर्‍याच सवर्ण हिंदू व मुस्लिमांना देखील वहिवाटीचा अधिकार नाही. या सर्व भूमिहीन शेतकर्‍यांजवळ केवळ काम करणारे हात आहेत.

मुल्क राज आनंद: मग तर कामाच्या अधिकाराला मुलभूत अधिकार म्हणुन मान्यता द्यायला हवी होती.

डॉ. बी. आर. आंबेडकर: मी केवळ मसुदा समितीच्या सदस्यांपैकी एक होतो.

मुल्क राज आनंद: म्हणजे तुम्ही सिंहांपुढे एक कोकरू होतात!

डॉ. बी. आर. आंबेडकर: चांगल्या कामासाठी मी में.. में.. करीत राहिलो! आता मी डरकाळी देतो आहे!

मुल्क राज आनंद: वकील असल्याकारणाने तुम्ही हे जाणताच की, न्यायाधीश कशा रितीने उच्च वर्णीय व उच्च वर्गीय हिंदूंच्या बाजूने निर्णय देतात.

डॉ. बी. आर. आंबेडकर: निश्चितच, संपत्तीचा अधिकार मुलभूत अधिकारात समाविष्ट करण्याच्या विरोधात प्रखरपणे संघर्ष करणारा पं. जवाहरलाल नेहरूंच्या सरकारमध्ये मी एकमेव ब्राम्हणेतर होतो…. परंतु राजेंद्र बाबू प्रसाद यांना वाटत होते की, नेहरू भारताला रशिया बनवू पाहत आहेत. त्यामुळे सवर्ण हिंदूंनी व्यक्तीच्या इतर अधिकारांना फक्त मार्गदर्शक तत्वे म्हणुनच मान्यता दिली….. ज्यासाठी संसदेत संघर्ष केला पाहिजे.

मुल्क राज आनंद: जी संपत्तीवान व्यक्तींच्या बाजूनेच झुकलेली असते.

डॉ. बी. आर. आंबेडकर: एक दिवस समाजवाद्यांचा बहुमताने विजय होऊ शकतो. त्यावेळी चुका दुरुस्त करण्यास सांगता येते. सरतेशेवटी, अवर्ण जाती व आदिवासींना अनुसूचीत जाती व जमाती घोषित करण्यात आलेले आहे. त्यांना वर येण्यासाठी काही विशेषाधिकार देण्यात येतील. जसे- शाळा व महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण व शिष्यवृत्ती.

मुल्क राज आनंद: सवर्ण हिंदू आरक्षणाचा नेहमीच राग करतील.

डॉ. बी. आर. आंबेडकर: आपण आपल्याला संघटीत केले पाहिजे. वारसा हक्क काढून घेतलेल्यांना जागृत करावे करा. देशात सवर्ण हिंदूंपेक्षा मागास जाती जास्त आहेत, त्यात जातिवादी ज्यांना अस्पृश्य समजतात त्या मुस्लिमांना जोडले, आदिवासींना जोडले तर समाजवाद्यांसोबत मिळून खाजगी संपत्तीची मालकी संपुष्टात आणू शकतील. ना राहील जमीनदार ना कुणी बटईदार! ना कुणी भूमिहीन शेतमजूर!

मुल्क राज आनंद: राज्य भांडवलशाही सुद्धा भयानक सिद्ध होऊ शकते. रशियात स्टॅलिनने काय केले, हे तुम्ही जाणताच. कम्युनिझमच्या नावाखाली नोकरशहांच्या समुहाला लोकांवर लादले!

डॉ. बी. आर. आंबेडकर: खरंय! आपण दुसर्‍या व्यक्तींकडून हनन होण्यापासून एका व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण केलेच पाहिजे. व्यक्तिच्या स्वातंत्र्याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. मुलभूत अधिकारांची गळ घालत असताना माझ्या डोक्यात हेच होते.

मुल्क राज आनंद: ही गोष्ट तुमच्या मनात होती तर तुम्ही मुलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करण्यास उद्युक्त करायला पाहिजे होते. आपण राज्य भांडवलशाही व खाजगी भांडवलशाही या दोहोंच्या विरोधात लढले पाहिजे. बहुसंख्य जनता सगळीकडे कशा प्रकारे मालकांच्या मर्जीवर अवलंबून असते, हे तुम्ही जाणताच.

डॉ. बी. आर. आंबेडकर: खरे तर, स्वातंत्र्य हे जमीनदारांच्या भाडे वाढवण्याच्या स्वातंत्र्यात रूपांतरित झाल्यासारखे दिसते. भांडवलदार नेहमी मजुरी कमी करण्याच्या व कामाचे तास वाढवण्याच प्रयत्न करीत असतात. भांडवलशाही ही खाजगी मालकांची हुकूमशाहीच आहे.

मुल्क राज आनंद: मुलभूत अधिकार- जीवनाचा, स्वातंत्र्य व सुख समाधानाचा अधिकार हे स्वप्नच राहिले आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर: नवयुवकांनी संघर्षरत झालेच पाहिजे. ते राज्यघटना बदलू शकतात.

मुल्क राज आनंद: फ्रान्समधील १७८९ च्या क्रांतीसारख्या बदलशिवाय हे शक्य होणार नाही.

डॉ. बी. आर. आंबेडकर: हे तुमच्याकडून ऐकून आश्चर्य वाटले! मला वाटले की तुम्ही कादंबरीत गांधींना अस्पृश्यांचा मुक्तिदाता बनवल्यामुळे तुम्हीही अहिंसावादी झाले असाल.

मुल्क राज आनंद: मी महात्म्याच्या कल्पना आचरणात आणू शकत नाही. आपल्याला हिटलर आणि मुसोलिनीचा सामना करावा लागला आहे. मी स्पेनला गेलो व अंतरराष्ट्रीय ब्रिगेडमध्ये सामील झालो. इस्पितळात रक्त पाहून मी जरी बेशुद्ध झालो व ब्रिगेड सोडून जाण्यास सांगण्यात आले तरी कुणाला तरी दुसर्‍या महायुद्धात भाग घ्यावाच लागला होता. एका कवीने तथाकथित युद्धाला फॅसिझमविरुद्ध लोकशाही स्वातंत्र्याचे युद्ध म्हटले, ‘अर्ध्या असत्त्या’साठी ‘मोठ्या असत्त्या’विरुद्ध युद्ध.

डॉ. बी. आर. आंबेडकर: तुम्हाला माहीत आहे की, महात्मा हरिजनांसाठी सर्वस्व जरी असले तरी भगवद गीतेत सांगितलेल्या वर्णाश्रमावरील श्रद्धेच्यावर उठू शकले नाहीत….. हरिजनांना सर्वोच्च देवाची, हरीची संतान संबोधून हरिजनांना ते उच्च स्थानी बसवत आहेत असे त्यांना वाटले असेल. परंतु प्रत्यक्षात त्यांना अतिशय खालच्या पातळीवर सोडून दिले.

मुल्क राज आनंद: यामुळेच तुम बौद्ध धर्म ग्रहण करताहात?

डॉ. बी. आर. आंबेडकर: हा मुख्य विचारही असू शकतो. परंतु अनुसूचित जातीचा नागरिक असल्यामुळे कुण्या व्यक्तिला जातबाह्य मानले जाणे हे दुसरे कारण आहे. मला बुद्धावर विश्वास वाटला, ज्याने हिंदू देवता ब्रम्हाला मानण्यास विरोध दर्शवला तसेच संपूर्ण मानवतेला, स्त्री-पुरुषांना धार्मिक दुराग्रहांपासून मुक्त होण्यास प्रेरित केले होते. दुर्बोध  पुराणकथा  व आख्यायिका! कुणीही ज्ञान ग्रहण करू शकतो! देव, राजा, व विष्णूचा अवतार राम यांसारख्या हिंदूंच्या जातिवादी देवतांशी संबंध तोडू शकतो आणि इतर बर्‍याच हिंदू दंतकथांपासुन मुक्त होऊ शकतो.

मुल्क राज आनंद: खरं आहे, मला सुद्धा हे समजले आहे की बुद्धाची अंतःप्रेरणा ब्राम्हणांच्या तर्कांपेक्षा जास्त युक्तिसंगत होती. तो जगातला पहिला अस्तित्ववादी होता. तो मोठ्याने ओरडला- दुःख, दुःख, दुःख! हिंदू नेहमी श्रद्धा ठेवणारे होते आणि ईश्वर एक आनंददायक चैतन्य असल्याचे सांगणारे. ईश्वराला पुजार्‍यामार्फत फुलांची भेट, फुलांच्या माळा व फळांची लाच दिली की तो प्रसन्न होतो असे भिकारी सरंजामी राजांना सांगत व त्या बदल्यात त्यांना दणाच्या स्वरुपात ईनाम दिले जाई.

डॉ. बी. आर. आंबेडकर: म्हणूनच बर्‍याच पुजार्‍यांकडे मोठी फुलबाग असे.

मुल्क राज आनंद: नाकारलेल्या समुहासाठी तुमचा कोणता संदेश असेल?

डॉ. बी. आर. आंबेडकर: अस्पृश्यांना माझे सांगणे आहे- ‘सिंह बना! हिंदू लोक कालीच्या मुर्तीपुढे बकर्‍याचा बळी देतात, सिंहाचा नव्हे! तुम्हीच तुमचा प्रकाश व्हा! ‘अत्त दीप भव!’

मुल्क राज आनंद: बुद्धाने आनंदाला म्हटल्याप्रमाणे: स्वतःतील दीप बना!…..’