पृथ्वीवर येऊ घातलेले संकट– भाग २

प्रस्तुत लेख हा पर्यावरण तज्ञ व अमेरिकेतील नासा गोडार्ड इंस्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडीजया संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. जेम्स हॅन्सेन यांनी लिहीलेल्या माझ्या नातवंडांपुढील वादळेया पुस्तकाचा सार आहे.  

२३)   हवामानाच्या निव्वळ प्रेरकाचा सर्वात जास्त परिणाम पृथ्वीच्या कार्यशक्तीच्या समतोलावर पडतो. जेव्हा हवामान प्रेरक स्थिर होत असतात तेव्हा पृथ्वी तप्त होते व अधिक उष्णता अवकाशात परत पाठवते व त्यामुळे कार्यशक्तीचा समतोल साधला जातो.

२४)   सुर्य जेव्हा सर्वात जास्त प्रखर असतो तेव्हा जो प्रेरक परिणाम कार्यरत असतो त्यापेक्षा सुर्य जेव्हा सर्वात कमी प्रखर असतो तेव्हाचा प्रेरक परिणाम उणे ०.२ वॅट्सएवढा कमी असतो. असा हा सुर्याचा उणे ०.२ वॅट्सएवढा प्रेरकपणा जरी महत्वाचा असला तरी तो प्रभुत्व गाजवणारा नाही. या उलट आता कार्बन डायऑक्साईडमुळे होणारा प्रेरक परिणाम औद्योगिकरण सुरू होण्याच्या आधीच्या काळाच्या तुलनेत १.५ वॅट्सएवढा आहे.

२५)   जर मिथेन हायड्रेट वितळण्याएवढी तापमानवृद्धी झाली तर प्रत्येक एक लिटर एवढ्या वितळलेल्या मिथेनमधून १६० लिटर एवढा मिथेन वायु निर्माण होतो व सुमारे दहा वर्षाच्या काळात या वायुचे ऑक्सिडेशन होऊन तीव्र असा ग्रीनहाऊस वायु निर्माण होतो. यामुळे शेकडो वर्षे हवामान तप्त राहू शकते. आता गेल्या दश लाखो वर्षांच्या थंड हवामानामुळे हा मिथेन हायड्रेट साठा पुर्णपणे पक्व झालेला आहे.

२६)   १९७०च्या दशकात जेव्हा उपग्रहाद्वारे धृवांवरील बर्फसाठ्याची बिनचूक मोजणी झाली तेव्हा जेवढा बर्फसाठा उत्तर धृवावर होता,त्यापेक्षा २००७  मधील बर्फसाठा ४० टक्क्यांनी  कमी होता. काही दशकांच्या आंतच,वाढत जाणार्‍या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमुळे उत्तर धृवावरील उन्हाळ्याच्या शेवटी असणारा बर्फसाठा शून्य झाललेला असेल. याचा खूप वाईट परिणाम वन्यजीव व स्थानिक जनतेवर होणार आहे.

२७)   पर्वतांवरील बर्फसाठा संपुर्ण जगात आता नाहीसा होत चालला आहे. या बर्फसाठयापासून सुरू होणार्‍या नद्यांतून अनेक कोटी लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असते. पर्वतावरील बर्फसाठा नाहीसा झाला तर त्या नद्यांना  थंडीत  व त्यानंतरच्या  ताबडतोबीच्या काळात  प्रचंड पूर येतील व उन्हाळ्यात या नद्या कोरड्या असतील. यामुळे शेतीवर प्रचंड मोठा विपरीत परिणाम घडून येईल.

२८)   गीनलँड व दक्षिण धृवाच्या पश्चिमेकडील बर्फसाठा दरवर्षी १०० घन किलोमीटर एवढ्या वेगाने कमी होत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी दर दहा वर्षांनी तीन सेंटीमीटर या वेगाने वाढत चालली आहे.

२९)   असे आढळून आले आहे की उपउष्णकटीबंधीय धृवांच्या दिशेने ४ डिग्री रेखांश एवढ्या प्रमाणात सरासरीने वृद्धिंगत झाले आहे. म्हणुन संयुक्त राज्याच्या दक्षिण भागात,मेडिटेरियन व आस्ट्रेलिया या प्रदेशातील कोरडा भूभाग  वाढला आहे. पश्चिम संयुक्त राज्यात आगी लागण्याची संख्या व त्याचे क्षेत्रफळ गेल्या अनेक दशकांत ३०० टक्क्यांनी  वाढले आहे.

३०)    समुद्रातील प्रवाळ क्षेत्रात तेथील प्रजातींपैकी २५ टक्के प्रजाती जगत असतात व समुद्राच्या पाण्याची आम्लता व पाण्याचे तापमान वाढल्यामुळे या प्रजातींवर विपरीत परिणाम होतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की त्यापैकी काही कार्बनडायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात विरघळला जातो व त्यामुळे ते पाणी अधिक आम्लता धारण करते. ज्या प्राण्यांचे बाह्यांग वा अंतर्गत अंग कार्बोनेटच्या शिंपल्याद्वारे बनते,त्या प्राण्यांना जगणे अशक्य होते कारण आम्लतेमुळे कार्बोनेट पाण्यात विरघळून जाते.

३१)    सामान्य जनतेची जाणीव व वैज्ञानिक सत्य यांमध्ये आता प्रचंड दरी निर्माण झाली आहे. आता जनतेच्या थोड्या विभागात जागतिक तापमानवृद्धी बाबत जागृती येण्यास सुरुवात झाली आहे व शास्त्रज्ञांपैकी ज्यांना ते जे जे बोलत आहेत ते समजत असेल तर त्यांना हे कळून चुकले आहे की हवामान व्यवस्था आता जिथून परत मागे फिरता येणार नाही अशा टप्प्यावर येऊन ठेपली आहे.

३२) डॉ. जेम्स हॅन्सेन पृष्ठ क्रमांक २२४ वर लिहितात की,त्यांच्या निरीक्षक्षणास आले आहे की प्रसार माध्यमांनी राजकारणी मंडळींना अशी सवलत दिली आहे,ज्याद्वारे हे राजकारणी बेगडा पर्यावरणवाद व बेगडी पर्यावरणीय संकल्पना समाजात पसरवू शकतात. वाशिंग्टनमध्ये हजारो तेल,वायु व कोळसा दलाल कार्यरत आहेत व त्यांना खूप पैसे दिले जात आहेत. म्हणुनच यात आश्चर्य नाही की सरकारी धोरणे फोसिल इंधन उद्योगाच्या बाजूने घेतली जात आहेत.

३३)    आकाशीय तीन ग्रहांपैकी केवळ ‘पृथ्वी’च अशी की जेथे जीवांचे जगणे शक्य होऊ शकते. मंगल खूप थंड आहे तर शुक्र खूप गरम आहे. सुर्यापासून ज्या अंतरावर ग्रह असतो ते अंतर आणि ग्रहाची सुर्य प्रकाश परावर्तीत करण्याची क्षमता यांवर त्या ग्रहाचे तापमान अवलंबून असते. परंतु त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान,वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंच्या प्रमाणावर खूप अवलंबून असते.

३४)   मंगळावरील वातावरणात एवढ्या कमी प्रमाणात वायु आहे की त्याचा ग्रीनहाऊस परिणाम दुर्लक्षणीय आहे व त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान उणे ५० डिग्री सेंटीग्रेड एवढे आहे. पृथ्वीवरील ग्रीनहाऊस वायूंमुळे पृथ्वी ३३ डिग्री सेंटीग्रेड एवढी तप्त होते,परंतु पृथ्वीवरील सरासरी तापमान १५ डिग्री सेंटीग्रेड एवढे आहे. शुक्र या ग्रहावर एवढा कार्बन डायऑक्साईड आहे की तेथे ग्रीनहाऊस परिणामांमुळे पृष्ठीय तापमान ४५० डिग्री सेंटीग्रेड एवढे आहे. या तापमानात शिसे सुद्धा वितळून जाईल.

३५)   शुक्र जवळ जवळ पृथ्वी एवढाच मोठा आहे. त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या ९५ टक्के एवढा आहे. जेव्हा ही सूर्यमालिका अस्तित्वात आली तेव्हा शुक्र आणि पृथ्वी हे दोन्ही ग्रह एकाच प्रकारच्या वायू व धुळीपासून तयार झाले असावेत व म्हणून वातावरणीय वस्तुमान सुद्धा समान होते. जसजसा सुर्य तप्त होत गेला,तसतसे शुक्रावरील तापमान वाढत गेले. त्यावरील पाण्याची वाफ झाली असावी आणि या वाफेच्या तीव्र ग्रीनहाऊस परिणामामुळे शुक्रावरील तापमान वाढत गेले असावे. अंततः समुद्राचे पाणी उकळू लागले वा वातावरणातील वायूंमध्ये सामील झाले. शुक्रावरील पृष्ठीय वस्तुमान एवढे तप्त झाले असावे की त्यामधील कार्बनचे रूपांतर वातावरणातील  कार्बन डायऑक्साईड मध्ये झाले. त्या पृष्ठभागावर एवढा कार्बन होता की एकूण वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ९७ टक्के आहे. याप्रमाणे शुक्रावर एवढा घातक ग्रीनहाऊस परिणाम घडून आला.

३६)    पृथ्वीवरील जीवसृष्टी सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र बर्फ पसरला होता,त्यावेळी उदयास आली असावी. या आधी पृथ्वीवरील सर्वात जास्त गुंतागुंत असलेले सजीव एकपेशीय प्रोटोझोआ व फिलॅमेंट असलेले शेवाळे (ॲलगी) अस्तित्वात होते. त्वचेचे संरक्षण असलेल्या पेशींचे रूपांतर ११ विविध रचना असणार्‍या शरीरिय फायलममध्ये झाले. अजूनही पृथ्वीवरील अस्तित्वातील सर्व प्राण्यांमधील शरीर रचना या ११ फायलम द्वाराच तयार होते.

३७)   ऊर्जेची कार्यक्षमता वाढवण्यास,पुनःउपलब्ध होऊ शकणार्‍या उर्जेला व चवथ्या पिढीच्या अणुवीजेला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

३८)     आपण जर तेल,वायु व कोळसा यांचे सर्व साठे वापरात आणले तर यामुळे घातक असणार्‍या ग्रीन हाऊस परिणाम सुरु होण्याची दाट शक्यता आहे,या निष्कर्षाप्रत डॉ. जेम्स हॅन्सेन आले आहेत. जर आपण स्टार सँडस व स्टार शेल जाळायला सुरुवात केली तर डॉ. जेम्स हॅन्सेन यांच्या सांगण्यानुसार शुक्र ग्रहावर जे अंतिमतः घडून आले ते पृथ्वीवर सुद्धा घडून येईल या बद्दल त्यांना खात्री आहे.

३९)    वितळत जाण्यार्‍या बर्फ साठ्यामुळे जे दुष्परिणाम घडणार आहेत त्यामध्ये सर्वाधिक शक्तिशाली असणारी वादळे आणखी विनाशकरक होतील,हा घटक समाविष्ट आहे. जी वादळे सुप्त उष्णतेमुळे ऊर्जा प्राप्त करतात,त्या सर्वांसाठी हे विधान लागू पडते. हरिकेन व टायफून्स ही सर्व वादळे सुप्त उष्णतेमुळे कार्यरत होतात. शक्तिशाली वादळे अधिक वेगवान असतील. उष्ण हवामानात अधिक वाफ असते व त्यामुळे अधिक सुप्त उष्णता असते. जागतिक तापमान वृद्धीमुळे अधिक शक्तिशाली वादळे निर्माण होतील. आपण आताच जगात सर्वत्र शंभर वर्षांतील पूर अनुभवले आहेत.

४०)    समुद्राचे तापमान जसजसे वाढत जाईल तसतसे उष्णकटीबंधीय वादळे तयार होणार्‍या भूभागाचे क्षेत्रफळ  सुद्धा वाढत जाईल. याबाबत खात्री निर्माण करणारे कतरिना वादळाचा वेग  मार्च २००४ साली ताशी ८० मैल होता.

४१)    थंडर स्टॉर्म्समुळे प्रचंड हानी पोहचते. जेव्हा उष्ण व वाफयुक्त हवा,थंड हवेला भिडते तेव्हा थंडर स्टॉर्म्स तयार होतात. थंड वातावरण असणार्‍या प्रदेशात गरम हवा वर वर जाऊ लागते तेव्हा वातावरणातील वाफेचे रूपांतर पाण्यात होते व सुप्त उष्णतेमुळे वर जाणारी हवा अधिक वेगाने वर जाते. आजूबाजूची थंड हवा तेवढ्याच जोराने खाली येते व त्यामुळे जमिनीवर विनाश घडून येतो.

४२)    वादळांची ताकद व त्यांचे भौगोलिक क्षेत्र वाढणे हे घटक तर वादळाबाबतच्या वास्तवाची केवळ सुरुवात आहे. ज्या प्रमाणात जागतिक तापमान वाढत जाईल त्या प्रमाणात वादळांचे दुष्परिणाम एकाच दिशेने तीन प्रकारे प्रवास करू लागतील. मध्ये रेखांश असणार्‍या भागात अति  शक्तिशाली व विनाशकारक असलेली वादळे विकसित होतील. ही वादळे थंड व उष्ण वातावरणातील फरकांवर व वाफेच्या प्रमाणावर अवलंबून असतात. मार्च १९९३ साली उत्तर अमेरिकेत आलेल्या सुपर स्टॉर्मद्वारे या वादळांबाबत आपल्याकडे पुरावा उपलब्ध आहे. हे वादळ मध्य अमेरिकेपासून सुरू झाले व ते नोवा स्कोशिया,कॅनडापर्यंत पसरले. या वादळामुळे जमिनीवर अनेक इंचांपर्यंत बर्फ जमा झाले व पेनसिल्वानिया येथे तर २ ते ३ फूट बर्फ तयार झाला. एक कोटी लोकांची विद्युत यंत्रणा बंद पडली व ३०० लोक मृत्यू पावले. आता आपण लक्षात घेतले पाहिजे की समुद्राची पातळी १ ते २ मीटर वाढेल तेव्हा वादळाची विनाशशक्ति किती पटीने वाढेल.

४३)   समुद्राच्या पाण्याच्या वाढत जाणार्‍या पातळीचा परिणाम विकसनशील देशांवर कसा होणार आहे?बांग्ला देशासारख्या देशांमधील जी जनता समुद्र पातळीच्या काही मीटरच उंचीवर राहते,ती तर तिथे राहुच शकणार नाही. तिसरा परिणाम मिथेन हायड्रेटच्या वितळण्यातून घडून येईल. टुंड्रा प्रदेशात व काँटिनेंटलच्या समुद्रातील तळावरील मिथेन हायड्रेटमधून बुडबुडे येताना दिसत आहेत.

४४)   चीनची आर्थिक शक्ति जरी वाढली असली तरी समुद्राच्या वाढणार्‍या पातळीमुळे तेथील अनेक दशकोटी जनतेला स्थलांतरित व्हावे लागणार आहे व त्याचे दुष्परिणाम असह्य असतील. त्याच प्रमाणे अमेरिकेतील फ्लोरिडा व समुद्र किनार्‍यावरील इतर शहरे जेव्हा पाण्यात बुडतील तेव्हा तेथे काय स्थिति असेल याची कल्पना करा. जगातील एकमेकांवरील अवलंबित्व लक्षात घेता,सामाजिक व आर्थिक व्यवस्था कोसळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

४५)   पदार्थ विज्ञानाद्वारे भविष्यातील घटनांचा वेध घेणे सोपे आहे. या तीन एकाच दिशेने जाणार्‍या परिणामांचे वेळापत्रक समजणे कठीण आहे,पण त्या दुष्परिणामांमुळे होणार्‍या हानीची आपण निश्चितच कल्पना करू शकतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व मिथेन वायु यांचे प्रमाण अति झाल्यावर ग्रहाचे कार्यशक्ती संतुलन बिघडेल व याद्वारे पृथ्वीवर असलेल्या बर्फसाठ्याची विल्हेवाट लागेल. आपला ग्रह लवकरच शुक्राप्रमाणेच वाटचाल सुरू करेल.

 

लेखक पर्यावरण आणि मार्क्सवाद या विषयाचे अभ्यासक असून त्यांनी कित्येक आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तके अनुवादीत केली आहेत. त्यांची अनेक स्वरचित पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.