आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ५

फिराकगोरखपूरी या नावाने लेखन करणारे रघुवीर सहाय लोकांना माहीत आहेत ते एक शायर म्हणून. त्यांनी जेवढे लेखन पद्यात केले आहे तेवढेच गद्यातही केले आहे. परंतु त्यांचे गद्यात्मक लेखन पाहिजे तसे लोकांपुढे आलेले नाही. १९४७ सालातील ताणतणाव पाहून त्यांनी प्रस्तुतप्रदीर्घ लेख लिहिला होता. आज देशात पुन्हा तेच वातावरण निर्माण करण्यात आले असताना काही काळापूर्वीचा हा इतिहास आपल्याला निश्चितच मार्ग दाखवेल.

 

१७. या देशात वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांचे जीवन कशाप्रकारे एकमेकांत गुंतलेले आणि बांधलेले आहे, कशाप्रकारे आपसात रक्ता-मांसाचे संबंध आहेत, हे जाणून आणि समजून घेण्याकरिता सत्य परिस्थितीवर विचार करण्याची गरज आहे. मी केवळ काही उदाहरणे देईन. जर भारतातून सर्वच मुसलमानांना पिटाळून लावले तर केवळ मुसलमान करतात ते बनारसचे पितळेचे काम, जे जगात प्रसिद्ध आहे आणि ज्यातून कोट्यावधी रुपये परदेशातून भारतात येतात, ते संपुष्टात येईल. काम करणारे सर्वचे सर्व कारागीर मुसलमान आहेत आणि या बारकाईच्या कामांचीदुकाने आणि व्यापार हिंदूंचा आहे. यातून हिंदूंची शेकडो घराणी लाखो रुपये कमावतात आणि शेकडो वर्षापासून कमावत आले आहेत. मजूर केवळ मुसलमान आहेत परंतु ते असे मजूर आहेत ज्यांची जागा हिंदू मजूर घेऊ शकत नाहीत. हीच अवस्था बनारसच्या रेशमी आणि बनारसी साड्यांची आहे. यांचे कारागीरसुद्धा मुसलमान आहेत आणि सारेव्यापारीमात्र हिंदूआहेत.

मुरादाबादी भांड्यांची सुद्धाहीच गत आहे. सर्वच्या सर्व दुकाने हिंदूंची आहेत आणि सारेच्या सारे कारागीर मुसलमान आहेत. भारतात गालीच्याचे काम आणि काश्मीर मध्ये लाकडी, ऊनी, रेशीम, सोने-चांदी आणि इतर प्रकारच्या कलाकुसरीचे काम शंभरातील ९० मुसलमानांच्या हातात आहेत,परंतु व्यवसायाचा बराच मोठा भाग हिंदूंच्या हातात आहे. भारतात लक्षावधी मुसलमान असे विणकर आहेतज्यांनी बनवलेले कपडे फार सुंदर असतात,परंतु सुत मात्र हिंदूंच्या गिरण्यांमधून येतेकिंवा हिंदू-मुसलमान या दोघांनीही कातलेले सुत मुसलमान विणकर कामी आणतात. लखनौच्या खेळण्यांमधील सूक्ष्म काम आणि सौंदर्य दुसरीकडे कुठेही मिळणार नाही, त्यांचे बरेच विक्रेते हिंदू आहेत आणि तयार करणारे मुसलमान आहेत. आतशबाजी बनवण्याची कला केवळ मुसलमानांच्या हातात आहे, उत्तमोत्तम सुगंधी द्रव्य आणि तेल भारतात बहुत करून मुसलमानच बनवतात, कापड रंगवणारे सुद्धा बहुतेक मुसलमान आहेत. संगीत कलेत सुद्धा मुसलमानांनी किमया दाखवली आहे. अशाप्रकारे आपल्या राष्ट्रजीवनात शेकडो व्यवसायांना मुसलमानांच्या सहाय्याने चकाकी आलेली आहे. मुसलमानांना येथून घालवणे हे आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या त्या चकाकत्या पैलूंना मिटवण्यासारखे आहे आणि असे करून आपण भारताला आणि हिंदूंना एवढी हानी पोहोचवू जी आपण कधीही भरून काढू शकत नाही. मुसलमान कारागीर तर पाकिस्तानची वाट धरतील आणि भकास होईल भारत.

१८.  भीती आणि घबराट,  क्रोध आणि घृणा हे पुढे असलेल्या सत्यावरही पांघरून घालतात, काही लोक म्हणतात की भारतात चार कोटी मुसलमान वेळ आल्यास द्रोह करतील. आपल्या देशाच्या इतिहासात जेव्हा मुसलमान येथे आलेही नव्हते त्या काळात सुद्धा कमकुवत आणि बेपर्वा हिंदू सत्तेच्या विरोधात भयंकर कट-कारस्थाने हिंदूंनीच केलीत. लोकसंख्येचा एक भाग सत्ता उलथवून टाकेल,ही भीती तर प्रत्येक राज्याला असते.   लोक राज्य तर तेव्हाचसुरक्षित राहू शकते जेव्हा त्याची पापणी सुद्धा हलणार नाही. राज्य सांभाळणे म्हणजे खेळ नव्हे. मुसलमानांना येथून हुसकावून राज्यसत्तेला वाटणारी भीती दूर केली जाऊ शकत नाही. मी सांगितलेच आहे की,पाकिस्तानलाकाश्मीर गिळंकृत करायचा आहे. परंतु शेख अब्दुल्ला,काश्मीर मधील ८० टक्के मुसलमान आणि आपल्या सैन्यातील मुसलमान अधिकारी व शिपाई पाकिस्तानशीहातमिळवणी कांकरीत नाहीत? आणि भारताशी द्रोह कांकरीत नाहीत? मुसलमान भारताच्या लोक राज्याच्या विरोधात विश्वासघात किंवा शत्रुत्व करत असल्याचा पुरावा म्हणजे या बाबी आहेत?

१९. राज्याची मुळे बळकट करण्यासकालावधी लागतो. महात्मा गांधींची हत्या आणि त्यानंतर शेकडो ठिकाणी मिठाई वाटणे, काँग्रेसच्या सर्व नेत्यांची हत्या करण्याचे षड्यंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या कारवाया या गोष्टीचा उघड पुरावा आहेतकी, राज्याच्या विरोधात बंड आणि विश्वासघाताची भीती हिंदू आणि शीखांकडून सुद्धा असू शकते.

२०. हिंदू समाज एक असून सुद्धा लहान-मोठ्या समुदायांनी बनलेला आहेव प्रांतांमध्ये असूया आहे. दक्षिण आणि उत्तर भारतात बंगाली आणि बिहारींमध्ये मराठी आणि महाराष्ट्रीय, तामिळी, आंध्रा आणि गुजराती, राजपूत, ब्राम्हण, क्षत्रिय आणि हिंदूंच्या खुप सार्‍या जाती,अस्पृश्य हरिजन या सर्व जाती एकमेकांप्रति असूया बाळगत आहेत व त्या बाळगत आल्या आहेत. हिंदू धर्मात कोणतीही अशी जादू नाही की,आपसात विभक्त असणाऱ्यांना एक केले जाईल. जिल्हा बोर्डांच्या निवडणुकीत लाखो महत्व मते जातीपातीच्या आधारावर दिली गेलीयाला काहीच काळ लोटलेला आहे. आपले आगामी युग त्याच परिस्थितीमध्ये चमकदार बनू शकते जेव्हाआपण राज्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना एक करून पुढे वाटचाल करू आणि त्यातून एक अशी सामाजिकता ज्यामुळे जमातवादाचे तुकडे होतील. जर्मनी, इटली,अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि चीनचा  इतिहास सांगतो की, लहान लहान टोळ्या, प्रांत, जात-पात, धर्म आणि भाषेचे लोक त्याच परिस्थितीत राष्ट्रीयतेचे ऐक्य निर्माण करतात जेव्हा सरकार, राज्य आणि सामाजिक जीवनाची निर्मिती धर्माच्या आधारावर केली जाणार नाही.

२१.  जर आपण वीस पंचवीस वर्षाच्या युगाला एक एकक मानले तर या युगाचा हजारावा भाग कदाचित असा असेल की, केवळ हिंदू आणि मुसलमान यांच्या परस्पर-जीवनात संघर्ष निर्माण होईल, दररोजच्या जीवनात जो संघर्ष निर्माण होतो तो असा आहे की हिंदूच  हिंदूंच्या विरोधात जास्त अत्याचार करतो. सावकार आणि सामान्य माणूस, जमीनदार आणि शेतकरी, श्रीमंत आणि गरीब, मजूर आणि भांडवलदार हे कधी कधी स्त्री- पुरुष एकाच जातीचे कितीतरी विभागांचे बहुतेक अधिकारी आणि त्याच विभागातील सामान्य कर्मचारी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि सर्वसामान्य लोक यांच्या तर संघर्ष होतोच, जीवन तर त्यांचे संघर्षमय बनते आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे साधारणतः त्यात संघर्षातून निर्माण होतात,ज्यात हिंदू- मुसलमानांचा प्रश्नच निर्माण होत नाही. हिंदू आणि शीखांचीउन्नती आणि त्यांच्या जीवनाचे प्रगति रोखणारे मुसलमान नाहीत व ते होऊ शकत नाहीत, आपल्या अनुचित रूढी परंपरा, आपल्या समाजाची चुकीची संरचना, व्यवसायाच्या चुकीच्या प्रणाली, व्यापाराच्या नावावर निर्दयपणे नफा कमावण्याची लालसा आणि खुद्द आपल्या जीवनातील चुका, लाचखोरी, चोर बाजार, निरक्षरता, भूक आणि बेकारी हे खरे शत्रू आहेत. कधी कधी तर हिंदू-मुस्लीम संघर्ष उद्भवतात म्हणून याचा अर्थ हा नाही की आपले जीवन बरबाद करणारे मुसलमान आहेत.(अपुर्ण)